महेश सावंत, सिंधुदुर्ग : सावंतवाडी (Sawantwadi) मळगाव येथे रिक्षा आणि कारमध्ये (Rickshaw car accident) झालेल्या अपघातानंतर कारमधील पर्यटकांनी रिक्षा चालकास मारहाण केली. त्यावेळी अपघात पाहणाऱ्या सगळ्या लोकांनी कारला घेराव घातला. तिथं दोन्ही गटात मारहाण करण्यात आली आहे. ज्यावेळी रिक्षा चालकाला मारहाण झाली. त्याचबरोबर कारच्यामधल्या पर्यटकांनी त्याला कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथं असलेल्या तिघांनी रिक्षा चालकाची सुटका केली. त्याचबरोबर कारला घेरलं, कोणीचं माघार घ्यायला तयार नसल्यामुळे अखेरीस दंगलं नियंत्रण पथक (Riot Control Squad) मागवलं.
रिक्षा आणि कारचा अपघात झाला, त्यानंतर कारमधील पर्यटकांनी रिक्षा चालकाला मारहाण केली. त्याचबरोबर मारहाण करून पर्यटकांनी रिक्षा चालकाला आपल्या कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या तिघा तरुणांनी रिक्षा चालकाला पर्यटकांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही पर्यटकांनी मारहाण केली. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले. संतप्त ग्रामस्थांनी कारला घेराव घातला. तणाव एवढा वाढला की दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करावे लागले.
दंगल नियंत्रण पथकाने कार सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. संतप्त ग्रामस्थांनी कार पोलीस ठाण्यात नेताना कारचा पाठलाग केला. त्यावेळी अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. कित्येक तास चाललेला हा राडा अखेर रात्री उशिरा पोलीस ठाण्यात सुरु होता. दरम्यान रात्री उशिरा या प्रकरणी अपघात आणि धक्काबुक्कीचे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं असून कसून चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे.