गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या मेहकर तालक्यातील (mehkar) अंत्री देशमुख येथे मजूर महिलांना घेऊन जाणारी छोटी होडी पैनगंगा नदीत उलटली. या घटनेमध्ये एका मजूर महिलेचा मृत्यू (woman death) झाला आहे. तर सहा महिलांना वाचवण्यात यश आल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना काल सायंकाळी घडली असून मजूर महिला शेतातून घरी येत होत्या. शेतात जाण्यासाठी महिला होडीचा वापर करतात. काल रात्री घडलेल्या दुर्घटनेमुळे इतर महिला एकदम भयभीत झाल्या आहेत.
होडीत एकूण सात महिला होत्या, मजूरी करुन शेतातून काम आटोपून घरी परतत होत्या. त्यावेळी पैनगंगा नदीत असलेल्या कट्ट्यातून एका होडीत मजूर महिला बसलेले होत्या. सहा महिला काठावर उतरल्या, मात्र एकीचा पाय अडकला आणि होडिसह पाण्यात बुडाली. यावेळी महिला पाण्यात बेपत्ता झाली, शोधाशोध घेतला असता मिळून आली नाही.
महिला आणि होडी दोन्हीही दबली गेली होती. मात्र पाणी भरपूर असल्याने शोध घेणे शक्य नव्हते. आज सकाळी त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सरुबाई रामभाऊ राऊत अस ४५ वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. त्या महिला मजूर शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने गेल्या वीस वर्षांपासून या होडीचां वापर करतात अशी माहिती ज्ञानेश्वर देशमुख सरपंचांनी सांगितली आहे.