पतंग पकडणं महागात पडलं, गच्चीवरून तोल गेला आणि ..

| Updated on: Feb 10, 2024 | 8:11 AM

पतंग उडवण्याची बऱ्याच जणांना आवड असते. पण त्यामुळे अनेक दुर्घटना घडत असतात. पतंगाच्या मांजामुळे बऱ्याच जणांना दुखापत होऊ शकते, तर काटलेला पतंग पकडण्यासाठी धावतानाही दुर्घटना होऊ शकतात. असाच एक दुर्दैवी प्रकार मीरा रोडमध्ये घडला आहे

पतंग पकडणं महागात पडलं, गच्चीवरून तोल गेला आणि ..
Follow us on

मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : पतंग उडवण्याची बऱ्याच जणांना आवड असते. पण त्यामुळे अनेक दुर्घटना घडत असतात. पतंगाच्या मांजामुळे बऱ्याच जणांना दुखापत होऊ शकते, तर काटलेला पतंग पकडण्यासाठी धावतानाही दुर्घटना होऊ शकतात. असाच एक दुर्दैवी प्रकार मीरा रोडमध्ये घडला आहे. पतंग पकडण्यासाठी गच्चीवर जाणे एका मुलाला महागात पडले. पतंग पकडण्याच्या नादात गच्चीवरून तोल जाऊन अवघ्या 11 वर्षांचा मुलगा खाली पडला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मिरारोड पूर्व येथील पूजा नगर परिसरात हा दुर्दैवी प्रकार घडला. बिल्डींगच्या गच्चीवर पतंग पकडण्यासाठी गेलेल्या 11 वर्षीय मुलाचा तोल गेल्याने तो इमारतीवरून खाली पडल्याने मृत्यू झाला. अवघ्या काही तासांपूर्वीच तो सोसायटीच्या आवाराच इतर मित्रांसोबत सायकल चालवत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तसे स्पष्ट दिसत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरा रोड येथे तीन मजली इमारतीच्या गच्चीवरून हा मुलगा पडून दुर्घटना घडली. हमजा असे मयत मुलाचे नाव आहे.तो मिरा रोडच्या पूजा नगर येथील एका सोसायटीमध्ये त्याच्या पालकांसोबत राहत होता. मंगळवारी संध्याकाळी तो इमारतीच्या गच्चीवर खेळायला गेला होता. तेव्हा पतंग पकडण्याच्या नादात तोल जाऊन खाली पडला. त्याला तातडीने उपचारांसाठी मिरा रोडच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र डोक्याला जबर मार लागल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

गच्चीवर जाण्यासाठी होती बंदी तरी…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 वर्षांचा हा मुलगा सी विंग मध्ये राहत होता. त्यांच्या इमारतीच्या टेरेसचे दार नेहमीच बंद असायचे. मात्र सोसायटीमध्ये रिपेरिंग काम सुरु असल्याने बी विंगचे टेरेस उघडे होते. तो मुलगा पतंगासाठी नेहमीच त्या विंगमधून टेरेसवर जायचा, पण तेथील कामगार त्ययाला वर येणायापासून रोखायचे, अडवायचे. त्यामुळे तो नेहमी घरातच पतंग ठेवायचा. घटनेच्या दिवशी तो थोडा वेळ खाली इतर मित्रांसोबत सायकल चालवत होता. त्यानंतर संध्याकाळी तो नेहमीसारखा पतंग पकडण्यासाठी टेरेस वर गेला. तेव्हाही तेथील कामगारांनी त्याला ओरडून परत खाली पाठवले. पण थोड्या वेळाने तो पुन्हा वर आला आणि कामगारांचे लक्ष नसल्याचे पाहून टेरेसवर गेला. पतंग पकडण्याच्या नादात त्याचा तोल गेला व खाली पडलाय डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.