वेफर्स आणायला ती भावासह दुकानात गेली, पण दुकानातील काऊंटर तिच्या अंगावर पडला आणि..

| Updated on: May 18, 2023 | 11:40 AM

एक लहान मुलगी वेफर्स घेण्यासाठी दुकानात गेली असताना तिच्या अंगावर अचानक दुकानातील काउंटर पडले.

वेफर्स आणायला ती भावासह दुकानात गेली, पण दुकानातील काऊंटर तिच्या अंगावर पडला आणि..
प्रियकराकडून प्रेयसीच्या कुटुंबावर गोळीबार
Follow us on

मुंबई : दुकानातील जड काऊंटर अंगावर पडल्याने एका चिमुकलीचा मृत्यू (small girl died) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अंधेरी पूर्व भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या चार वर्षांची ही चिमुकली तिच्या दोन भावडांसोबत वेफर्स (went in shop to buy wafers) आणण्यासाठी दुकानात गेली होती.

मात्र त्या दुकानातील काऊंटर अचानक तिच्या अंगावर उलटला आणि ती खाली अडकून पडली. आजूबाजूच्या लोकांनी लगेच काऊंटर उचलून मुलीची कशीबशी सुटका केली. मुलीच्या कुटुंबियांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी लगेच धाव घेत तिला तातडीने जवळच्याच रुग्णालयात नेले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले, असे पोलीस सूत्रांनी बुधवारी सांगितले.

अंधेरीतील पूर्व येथील पंप हाऊस परिसरात ही धक्कादायक घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. ही चिमुकली, तिचा मोठा भाऊ आणि चुलत बहीण यांच्यासोबत ए-१ वेफर्सच्या दुकानात वेफर्स खरेदी करण्यासाठी गेली होती. ती ज्या काउंटरखाली अडकली होती त्या काउंटरमध्ये चाके असल्याचे तपासादरम्यान पोलिसांना आढळून आले. ही मुलगी काउंटरजवळ खेळत होती आणि अचानक काउंटर उलटले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, दुकानातील काउंटर थोडा उंच आहे. काउंटर त्यांच्या दिशेने उलटताना पाहून तिचा मोठा भाऊ आणि चुलत बहीण यांनी ताबडतोब तिथून पळ काढला. मात्र खेळण्यात व्यस्त असलेल्या चिमुकलीला तिथून उठता आलं नाही. आणि काउंटर उलटून ती त्याखाली चेपली गेल्याने तिचा मृत्यू झाला.

दुकान तिच्या राहत्या घरापासून काही अंतरावर असल्याने दुकानाचा मालक बाहेर आला आणि त्याने त्याच्या कामगारासह आणि काही स्थानिकांसह काउंटर हलवून अडकलेल्या मुलीला वाचवले. त्यानंतर कुटुंबियांनी तिला लगेचच रुग्णालयात नेण्यात आले, अधिकारी पुढे म्हणाले.

“आम्ही आयपीसीच्या कलम 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे आणि दुकान मालक आनंद राज आणि त्याचा कामगार कृष्णा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले गेले, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, असेही आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले.