चेन्नई : देशात सोने, विदेशी चलन, ड्रग्स तस्करीचे प्रमाण बरेच वाढले आहे. मुंबई, चेन्नई अशा महत्त्वाच्या शहरांत तस्करीचे रोज नवे प्रकार समोर येत आहेत. चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीचा आणखी एक नवा प्रकार समोर आला आहे. दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांनी चक्क टक्कल करुन आपल्या केसांच्या आत सोनं लपवलं होतं. हा प्रकार समोर आल्यानंतर सगळेच चकित झाले. हे सर्व प्रवासी सौदी अरेबीयामधील शाहजाह येथे सोन्याची तस्करी करणार होते. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांना अटक केली. (smugglers arrested in Chennai for smuggling gold under wig)
मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही तस्करांनी डोक्यावरील केस कापले होते. त्यानंतर विगच्या खाली त्यांनी सोने लपवले होते. सुरक्षा रक्षकांना संशय आल्यानंतर जेव्हा तस्करांना डोक्यावरील केस कापायला लावले, तेव्हा गंभीर प्रकार समोर आला. दोन्ही प्रवाशांच्या त्यांच्या डोक्यातून चक्क सोनं पडत होतं. हा प्रकार समोर आल्यानंतर कस्टम अधिकाऱ्याने अन्य 7 प्रवाशांची झडती घेतली. यापैकी आणखी तीन तस्करांच्या केसांमध्ये म्हणजेच विगच्या आत सोनं निघालं. तर बाकीच्या चार तस्करांच्या विगखाली चक्क विदेशी नोटा सापडल्या. पोलिसांनी नंतर सखोल चौकशी केल्यानंतर सोने तस्करी रॅकेटमध्ये आणखी 14 प्रवासी सामील असल्याचे समोर आले. या सर्व प्रवाशांनी पोलिसांनी अटक केलीये.
मिळालेल्या माहितीनुसार या तस्करांकडून तब्बल अडीच कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आलेय. तसेच 24 लाख भारतीय मूल्य असलेले विदेशी चलनही या प्रवाशांकडून जप्त करण्यात आले. ज्या प्रवाशांच्या डोक्यावर सोनं आढळलं ते चेन्नई येथून सौदी अरेबियातील शारजाह येथे जाणाच्या तयारीत होते. मात्र, शारजाह येथे जाण्याआधीच पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रवाशांना अटक केली.
दरम्यान, सर्व आरोपींच्या डोक्यावरील केस कृत्रिम वाढल्यामुळे पोलिसांनी या प्रवाशांची झडती घेतली. अधिक चौकशी केल्यानंतर प्रवाशांनी विगखाली सोनं लपवल्याचं पोलिसांना समजलं.
‘मुख्यमंत्र्यांना कणा नाही हे त्यांनी दाखवून दिलं, हे सरकार बरखास्त करा’, प्रकाश आंबेडकरांची राज्यपालांकडे मागणीhttps://t.co/iUFOiHpoBc#PrakashAmbedkar #VBA #AnilDeshmukh #CMUddhavThackeray #BJP #ParambirSingh #SachinVaze @Prksh_Ambedkar
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 22, 2021
इतर बातम्या :
दुर्घटनेत हात-पाय गेले, नियतीने साथ सोडली, पण ‘तिने’ नाही, डोळ्यांमध्ये पाणी आणणारी प्रेम कहाणी
#JanataCurfew | जनता कर्फ्यूची वर्षपूर्ती, सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ, फोटो व्हायरल
(smugglers arrested in Chennai for smuggling gold under wig)