सागर सुरवसे, सोलापूर | सोलापूर जिल्ह्यात एक भीषण अपघाताची (Bus Accident) घटना घडली आहे. 35 प्रवासी घेऊन जाणारी बस अचानक पलटी झाली. या अपघातावेळी बसचा वेग कमी होता. मात्र रस्त्यात आलेल्या ऊसाच्या ट्रकला (Sugarcane truck) ओव्हरटेक (Overtake) करण्याच्या प्रयत्नात बस रस्त्यावरून खालील बाजूला पलटी झाली. यामुळे अनेक प्रवाशांना दुखापत झाली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात ही घटना घडली. सुर्डी मालनंजी गावाजवळ असा बसला अपघात झाला. अपघातानंतर बस पूर्णपणे पलटी झाली. त्यामुळे प्रवाशांच्या जीवावर बेतण्यासारखी स्थिती होती.
कुर्डुवाडी येथून वैरागच्या दिशेने ही बस निघाली होती. प्रत्यक्ष दर्शींनी सांगितल्या प्रमाणे बस वेगात नव्हती, मात्र ऊसाच्या ट्रकच्या पुढे जाताना चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला.
ऊसाचे ट्रॅक्टर रस्त्याच्या मधोमध जात असल्याने एसटी ओव्हरटेक करताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात गेली..
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र लहान मुले आणि महिला किरकोळ जखमी झाले आहेत.
दरम्यान ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली आली. यावेळी रस्त्यावरील वीजेच्या खांबाला धडक झाल्याने दोन खांब रस्त्यावर पडले.