करमाळा : तालुक्यातील भाळवणी (BHALWANI) गावाच्या हद्दीमध्ये असलेले सरकारमान्य ‘आर्यन’ बियर शॉपीमध्ये (beer shop) 24 मार्चला रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी तीन दरोडेखोरांनी चोरी केली होती. त्यावेळी एकूण 10 हजार रुपयांपर्यंतचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याचे दुकानाचे मालक मच्छिंद्र शिंदे यांनी माहिती दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस स्टेशनमध्ये (Solapur Police station) माहिती देऊन आतापर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती मच्छिंद्र शिंदे यांनी दिली आहे. मागच्या सहा दिवसापुर्वी हे प्रकरण झाले असून पोलिस गुन्हा दाखल करायचा तयार नाहीत. त्यामुळे याच्यामागे कायतरी भलंतच कारण असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, मच्छिंद्र शिंदे यांचे जेऊर ते टेंभुर्णी हायवेलगत भाळवणी गावाच्या हद्दीमध्ये आर्यन बिअर शॉप या नावाने दुकान आहे. शिंदे नेहमीप्रमाणे 24 मार्चला रात्री 10 वा. बियर शॉपी बंद करून कुलूप लावून घराकडे गेले. मध्यरात्री 2 वाजून 35 मिनिटांनी तीन अज्ञात व्यक्ती दुकानाच्या शटर जवळ आल्या. त्यांच्याकडे विविध साहित्य होते. त्यांनी कटरने दुकानाचे शटर उचकटले. दुकानाच्या बाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायर कट केल्या. त्यानंतर त्यांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील सीसीटीव्हीचे वायर कट करून, गल्ल्यांमध्ये असलेली रोकड काढून घेतली. त्याचबरोबर दुकानातील एक बिअरचा बॉक्स लंपास केला.
दुकानाच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना याची चाहूल लागल्यामुळे, त्यांनी दुकानात होत असलेल्या चोरीची कल्पना शिंदे यांना फोन करून दिली. त्यानंतर शिंदे यांनी तात्काळ दुकानाकडे धाव घेतली. परंतु त्यापूर्वी चोरांनी तेथून पोबारा केला होता. आसपास राहणाऱ्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात असलेला माल बचावला गेला आहे. यानंतर मच्छिंद्र शिंदे यांनी करमाळा पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी गेले असता, तेथील अधिकाऱ्यांनी त्यांची आतापर्यंत कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवून घेतली नाही. याच्या आगोदर दोनवेळा बिअर शॉपीमध्ये चोरी झाली असल्याची माहिती बिअर शॉपी मालकाने दिली आहे