डोकेबाज चोरट्यांचा नवा कारनामा पुन्हा उजेडात, मुंबई एक्स्प्रेस रेल्वे लुटण्यासाठी अंधारात फायदा घेतला, मग…

| Updated on: Jun 20, 2023 | 11:36 AM

सोलापूरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. मुंबई एक्स्प्रेस रेल्वे लुटण्यासाठी त्यांनी एक जुगाड केला होता. परंतु तो जुगाड महिलांच्या लक्षात आल्यानंतर मोठी आरडाओरड झाली.

डोकेबाज चोरट्यांचा नवा कारनामा पुन्हा उजेडात, मुंबई एक्स्प्रेस रेल्वे लुटण्यासाठी अंधारात फायदा घेतला, मग...
mumbai hydrabad express
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सोलापूर : करमाळा (Solapur karmala) तालुक्यातील केम ते ढवळस रेल्वे स्थानकादरम्यान रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी लाल रंगाचे कापड दाखवून मुंबई – हैदराबाद एक्सप्रेस (mumbai hydrabad express) गाडी थांबवली. त्यानंतर गाडीतील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. परंतु तो प्रयत्न फसला असल्याची माहीत मिळाली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास केम रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. पोलिसांनी (solapur police) चोरट्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे डोकेबाज चोरट्यांनी जी काही शक्कल लढवली होती. त्यामुळे पोलिसांची पुन्हा डोकेदुखी वाढली आहे. सीसीटिव्ही तपासून चोरट्यांचा शोध घेतला जाणार आहे.

नेमकं काय झालं

मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस रेल्वे गाडी क्रमांक – 22732 ही गाडी केम येथून रात्री साडे नऊच्या सुमारास ढवळसकडे निघाली होती. त्याचवेळी चोरट्यांनी रुळावर लाल रंगाचे कापड लावल्याने चालकाने गाडी थांबवली. चोरट्यांनी बोगी नंबर 2 बर्थमध्ये शिरकाव केला, महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र रेल्वे डब्यात हिसकावले. काहीतरी भयानक घडत असल्याची महिलांना कल्पना आल्यानंतर त्यांनी जोरात आरडाओरडा करायला सुरुवात केली.

चोरांनी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले

यावेळी रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस रेल्वेगाडी जवळ येताच, चोरांनी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. याबाबत रेल्वे सुरक्षा बलाचे उज्वल रहांग हाळे यांनी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, त्याचबरोबर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याविषयी अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा

चोरट्यांनी चोरी करण्यासाठी शक्कल लावली होती. परंतु महिलांनी आरडाओरडा केल्यामुळे त्याचा जुगाड पुन्हा उजेडात आला आहे. हे प्रकरण गंभीर असून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.