आई-वडिलांशी कडाक्याचं वाजलं, म्हणून मुलाने त्यांना खोलीत बंद केलं, अन् ऐकू आली भयानक किंकाळी….

| Updated on: Jun 15, 2023 | 4:48 PM

एका तरुणाचा आपल्या आई-वडिलांशी काही गोष्टीवरून वाद झाला. या वादानंतर त्याने आई-वडिलांना खोलीत कोंडले आणि त्यानंतर....

आई-वडिलांशी कडाक्याचं वाजलं, म्हणून मुलाने त्यांना खोलीत बंद केलं, अन् ऐकू आली भयानक किंकाळी....
क्षुल्लक कारणातून दोन गटातील वादातून तरुणाची हत्या
Follow us on

भोपाळ : पालकांशी प्रत्येक मुला-मुलीचे वाद होत असतात. काही वेळा भांडण मिटतं तर काहीवेळेस ते वाढतही. पण वादापायी कोणी आपल्याच जन्मदात्यांना इजा करत नाही. मात्र मध्य प्रदेशमध्ये एक असा धक्कादायक प्रकार घडला आहे. तेथे एका मुलाचा आई-वडिलांशी वाद झाला असता त्याने आधी त्यांना एका खोलीत कोंडून ठेवले. आणि नंतर त्याचे मुलाने आपल्याला जन्म देणाऱ्याच पालकांचा जीव ( son killed parents) घेतला.

त्यांना खोलीत कोंडून त्यांच्यावर हिंसक हल्ला केला. हत्येनंतर आरडाओरडा ऐकून शेजारीही चक्रावले. त्यांनी येऊन ते दृश्य पाहिल्यावर ते अक्षरश: भीतीने गोठले. शेजाऱ्यांनी या हल्ल्याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपी मानसिकदृष्ट्या विक्षिप्त आहे. त्याची चौकशी सुरू आहे.

आई-वडिलांच्या हत्येची घटना हट्टा पोलीस मध्य प्रदेशमधील बालाघाट येथील सिंगोडी गुणई गावची आहे. पोलिसांनी सांगितले की, 14 जून रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास पोलीसांना या हत्येची माहिती मिळाली. पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या मेश्राम कुटुंबातील पती-पत्नीचा खून झाल्याचे कळले. मुलाने आई-वडिलांवर फावड्याने वार करून हत्या केली आहे. माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला. हत्येनंतर त्यांचा मुलगा घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. शेजाऱ्यांचे जबाब नोंदवून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला.

खोलीत बंद करून केला हल्ला

पोलिसांनी सांगितले की, काही वेळाने आरोपी सरोज मेश्रामला घेराव घालून अटक करण्यात आली. सरोज मेश्राम हा गावातील एका महिलेसोबत भाजी विकतो. त्याचे मानसिक संतुलन ठीक नाही. 14 जून रोजी संध्याकाळी घरी परतल्यावर त्याचा आई-वडिलांशी कशावरून तरी वाद झाला. त्याचे मोठ्या भांडणात रुपांतर झाले. भांडणामुळे संतापलेल्या मुलाने काहीही विचार न करता त्याने आई-वडिलांना ओढत खोलीत बंद केले. त्यानंतर त्यांच्यावर फावड्याने सपासप वार केले.

किंकाळी ऐकून शेजारीही चक्रावले

या हल्ल्यामुळे पालकांनी आरडाओरडा सुरू केला. त्यांच्या किंकाळ्या एवढ्या जोरात होत्या की शेजारीही घाबरले आणि त्यांनी आवाजाच्या दिशेने धआव घेतली असता त्यांना बंद खोलीतून आवाज येत असल्याचे दिसले. दरम्यान, आरोपीने खोली उघडून पळ काढला. शेजारी खोलीत गेल्यावर ते गोठून गेले. त्या तरुणाच्या वडिलांचा मृत्यू झाला होता, तर आईची प्रकृती चिंताजनक होती. लोकांनी तातडीने त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले व पोलिसांनाही या प्रकाराची माहिती दिली. वृद्ध महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.