उत्तर प्रदेशात एका पाळीव कुत्र्यानं मालकाच्या आईवरच हल्ला (Dog Attacked) केला. हा हल्ला इतका भीषण होता, की त्यात 80 वर्षांच्या वृद्ध महिलेचा जीव गेला. पिटबुल (Pitbull Dog) जातीचा पाळीव कुत्रा एक जण घरी घेऊन आला. घराच्या रक्षणासाठी हा कुत्रा आणण्यात आला होता. हा कुत्रा आपल्या आईच्या मृत्यूचं कारण ठरेल, अशी कल्पनाही कुत्र्याच्या मालकानं केली नसेल! पण दुर्दैवानं तसंच घडलंय. उत्तर प्रदेशातील (UP Crime News) लखनौच्या कैसरबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घडना उघडकीस आली आहे. पाळवी पिटबुल जातीच्या कुत्र्यानं घरातील 80 वर्षांच्या वृद्धेवर हल्ला हेला. गच्चीत या कुत्र्याला फिरवण्याच्या उद्देशानं ही महिला कुत्र्याला घेऊन आली होती. त्यावेळी थरारक घटनेत या कुत्र्यानं वृद्धेवर हल्ला चढवला. आपल्या धारदार दातांनी या महिलेच्या शरिराचा चावा कुत्र्यानं घेतला. त्यात गंभीर जखम झालेल्या महिलेचा जीव गेलाय.
कैसरबाग ठाणा अध्यक्षांनी याबाबत अधिक माहिती दिली. या घटनेत मृत्यू झालेली महिला ही एक निवृत्त शिक्षिका होती. 80 वर्षांच्या निवृत्त शिक्षिकेवर घरातील पिटबुल जातीच्या कुत्र्यानं हल्ला चढवला. हा हल्ला अंगावर काटा आणणारा असा होता. या हल्लात कुत्र्यानं महिलेचं मांसही शरीरावेगळं केलं होतं. या हल्लावेळी महिला घरात एकटीच होती. तर तिचा मुलगा ही व्यायामशाळेत गेला होती. जीम ट्रेनर असलेला या महिलेचा मुलगा जेव्हा घरी आला, तेव्हा त्याला हा सगळा प्रकार पाहून मोठा धक्काच बसला. दरम्यान, या महिलेच्या पतीचा आधीच मृत्यू झाला होता.
कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव सुशिला त्रिपाठी आहे. कैसरबागच्या बंगाली टोका इथं ही 80 वर्षांची महिला आपल्या कुटुंबासोबत राहत होता. या महिलेचा मुलगा अमित त्रिपाठी हा जीम ट्रेनरचं काम करतो. पिटबुल या हिंसक कुत्र्याशिवाय त्रिपाठी यांच्या घरत आणखी एक कुत्रा पाळण्यात आलेला होता. लॅब्राडॉर जातीचा आणखी एक कुत्रा त्यांच्या घरात आहे.
सुशीला पिटबुल कुत्र्याला फिरवण्यासाठी म्हणून गच्चीत घेऊन गेल्या. तेव्हा त्याला फिरवत असताना या कुत्र्याची चैन उघडली गली आणि त्यानं अचानक सुशिला यांच्यावर हल्ला केला. या हल्लादरम्यान घरात कुणीच नव्हतं. कुत्र्याच्या हल्ल्याननंतर सुशिला स्वतःला वाचवण्यासाठी आरडाओरडा करत होत्या. विव्हळत होत्या. पण तोपर्यंत या कुत्र्यानं सुशिला यांच्या पोटाला, डोक्याला आणि चेहऱ्याला अत्यंत भयंकररीत्या जखमा केल्या होत्या. यानंतर घरात काम करणारी बाई आली, तेव्हा समोर दिसलेलं दृश्य पाहून ती हादरुन गेली. तिनं लगेचच अमित त्रिपाठी यांना फोन केला आणि त्यांना बोलावून घेतलं.
यानंतर जखमी सुशिला यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. पण तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे सुशिला यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अद्याप कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही.