सीलिअल किलर जोसेफ रॉय मेथेनी याने आपल्या आयुष्यात 13 हत्या केल्या. आपल्या प्रेयसीने धोका दिल्यानं तो बिथरला. संतापाच्या भरात जोसेफ हैवान बनला. त्याने कित्येकांचा जीव घेतला. हत्येनंतर त्याने केलेलं कृत्य जास्त हादरवणारं होतं. हत्या करुन जोसेफ मृतदेहाचं मांस काढून त्याचं सॅन्डविच आणि बर्गर बनवून विकत होता. ट्रक ड्रायव्हरचं काम करणारा जोसेफ मेथनी याला पकडण्यासाठी पोलिसांनाही प्रयत्नांची शर्थ करावी लागली होती.
हत्या करुन माणसाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून जोसेफ मोकाट फिरत होता. मृतदेह सापडला नाही, तर हत्येचा गुन्हा सिद्ध होत नाही, हे कळल्यानंतर तो जास्त घातक बनला होता. अमेरिकन सैन्यात काम केलेला जोसेफ सीरिअल किलर नेमका बनला कसा आणि तो पकडला कसा केला, याचा किस्साही रंजक आहे.
बाल्टीमोर शहरात जोसेफचा जन्म झाला. अभ्यासात तो हुशार होता. लहान वयातच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. नंतर त्याचं आईसोबतही पटत नव्हतं. वयाच्या 18व्या वर्षी तो अमेरिकन सैन्यात सामील झाला. त्यानंतर त्याची पोस्टिंग ही व्हिएतनाम इथं झाली.
पण सैन्यात त्याचं मन लागलं नाही. तो पुन्हा अमेरिकेत परतला. परत आल्यानंतर त्याला ड्रग्सचं व्यसन लागलं होतं. त्या दरम्यानच त्याची ओळख एका सेक्स वर्कर राहिलेल्या मुलीशी झाली. दोघं एकमेकांसोबत राहू लागले. दोघांना एक मुलगाही झाला. यावेळी जोसेफ ट्रक चालवून पैसे कमावयाचा.
एक दिवस ट्रक चालवण्यासाठी दूरवर गेलेला जोसेफ जेव्हा घरी आला, तेव्हा त्याची गर्लफ्रेन्ड आणि मुलगा बेपत्ता झाले होते. त्यांचा त्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण ते कुठेच सापडले नाहीत. जोसेफ बिथरला. त्याला काय करावं सुचत नव्हतं. आपल्या गर्लफ्रेन्ड आणि मुलाला ओळखणाऱ्या लोकांना भेटून तो चौकशी करुन लागला. पण काहीच हाती लागत नव्हतं.
एक दिवस असात तो एका तलावाच्या किनारी दोघा जणांना भेटला. गर्लफ्रेन्ड आणि मुलाची त्याने चौकशी केली. पण हाती काहीच माहिती लागली नाही, म्हणून तो संपातला. रागाच्या भरात त्याने दोघांच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालून हत्या केली. त्यानंतर दोघांचेही मृतदेह तिथेच फेकून दिले. पण ही घटना एकचा मासेमाऱ्यानं पाहिलं.
मासेमाऱ्याने आपल्याला हत्या करताना पाहिल्याचं कळताच जोसेफ याने मासेमाऱ्याचाही खून केली. त्याचा मृतदेह नदीत दूरवर फेकून दिला. शिवाय ज्या हातोडीने हत्याकांड केलं, तो हातोडाही फेकला.
दोन व्यक्ती गायब झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास सुरु झाला. पोलिसांनी हत्येचा छडा लावला. जोसेफला अटकही झाली. पण हा गुन्हा सिद्ध झाला नाही. कारण ज्याने हे हत्याकांड पाहिलं होतं, तो मासेमारी करणारा मनुष्यही सापडला नाही. शिवाय ज्या हत्याराने खून करण्यात आलेला, तो हातोडाही पोलिसांना सापडला नाही.
आता जोसेफ अधिक घातक झाला होता. मृतदेह सापडला नाही, तर हत्येचा गुन्हा सिद्धच होत नाही, हे त्याला समजलं होतं. त्यामुळे तो आता हत्या करतच सुटला. हत्येनंतर तो विकृत पद्धतीने मृतदेहांची विल्हेवाट लावू लागला.
लोकं गायब होऊ लागले होते. त्यांचे मृतदेहही सापडत नव्हते. एकच खळबळ उडाली होती. अशातच एका बॉक्समध्ये सफाई कर्मचाऱ्याला सांगाडा सापडला. हा सांगाडा एका महिलेचा होता. ही महिला सेक्स वर्कर होती. तिचा मृत्यू कसा झाला, का झाला, याचाही काहीच छडा लागू शकला नव्हता.
काही महिन्यांनी पुन्हा अशीच घटना समोर आली. पुन्हा आणखी एका सेक्स वर्करचा सांगाडा बॉक्समध्ये आढळून आला. पण हे कृत्य कुणी केलंय, ते कळायला मार्ग नव्हता. यादरम्यान, जोसेफ सेक्स वर्करची हत्या करुन त्यांच्या शरीरावरचं मांस काढत होता.
माणसांच्या शरीरावरील काढलेल्या मांसाचं तो सॅन्डविच आणि बर्गर बनवून विकायचा आणि स्वतःही खायचा. पोलिसांना हत्येचा कोणताही पुरावा हाती लागू नये म्हणून जोसेफ भयंकर कृत्य करु लागला होता. एकदा तर त्याने सेक्स वर्करची हत्या केली. तिचं मांस काढलं. त्यानंतर तिच्या सांगाड्यासोबत बलात्काही केला होता.
अनेक सेक्स वर्करला घरी बोलावून त्यांची हत्या जोसेफने केली होती. त्यानंतर त्यांच्या मृतदेहांची घृणास्पद पद्धतीने विल्हेवाट लावली होती. हे प्रकार वाढत असल्यानं पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं होतं. पण एका प्रकाराने जोसेफ पकडला गेला.
एका सेक्स वर्कर मुलीला ट्रकमधून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने जोसेफ सोबत घेऊन गेला. त्यानंतर तिला त्याने ड्रग्ज दिले आणि एका फॅक्टरीत घेऊन गेला. या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्याचा कट जोसेफने आखला होता.
पण मुलीला शंका आली. तिने जोसेफला हटकलं. त्याच्या डोक्यात प्रहार करुन ती त्याच्या तावडीतून पळून आली आणि पोलिसात गेली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. पण जोसेफ तोवर पळून गेला होता.
नंतर मुलीच्या सांगण्यावरुन जोसेफचं रेखाचित्र तयार करण्यात आलं. संपूर्ण शहरातले पोलीस जोसेफच्या मागावर होते. एक दिवस अखेर जोसेफला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तो दिवस 15 ऑगस्ट 1996. एका व्यक्तीने फोन करुन जोसेफची माहिती पोलिसांना दिली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस जोसेफ पर्यंत पोहोचू शकले होते.
पोलिसांच्या चौकशीत जोसेफने खळबळजनक माहिती उघड केली. 10 मुलीसह एकूण 13 जणांची त्याने हत्या केली होती. गर्लफ्रेन्डने धोका दिल्यामुळे जोसेफ हैवान बनला होता. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 21 वर्ष शिक्षा भोगल्यानंतर जेलमध्ये 2017 साली जोसेफचा मृत्यू झाला. जेलमधील कैद्याची जोसेफची मारहाण करुन त्याचा खून केल्याच्या बातम्या त्यावेळी समोर आल्या होत्या. पण नेमकं त्याच्या मृत्यूचं कारण काय होतं, हे अजूनही समोर येऊ शकलेलं नाही.