जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : एका पहिलीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा शाळेत मृत्यू (NANDURBAR CRIME NEWS ) झाल्यामुळे नातेवाईकांनी प्रशासनावरती गंभीर आरोप केले आहे. त्याचबरोबर त्या शाळेत शिकत (school boy death) असलेल्या इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुध्दा चिंता व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी सगळीकडं व्हायरल झाल्यानंतर शाळेच्या आवारात विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी आणि इतर नागरिकांनी गर्दी केली. अचानक विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने पालकांना मोठा धक्का बसला आहे. पालकांनी शाळा प्रशासनाला (toranmal government school) जाब विचारल्यानंतर समाधानकारक उत्तर न दिल्यामुळं शाळेत २१ तास गोंधळ सुरु होता. त्या विद्यार्थ्याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला असल्याची माहिती मिळाली आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील तोरणमाळ शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचा झोपलेल्या अवस्थेत मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाली, त्यानंतर नातेवाईकांनी शाळेच्या आवारात गर्दी केली. कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत त्याची चौकशी होऊन कारवाई होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्याचा मृत्यू ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. मात्र सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी तब्बल २१ तासानंतर मृतदेह ताब्यात घेतला आहे.
शाळेतील विद्यार्थ्याचा झोपेत मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत असल्यामुळे नागरिक चांगलेच संतप्त झाले आहे. विद्यार्थी आजारी होता, तर तुम्ही कळवलं का नाही ? त्याचबरोबर एका रात्रीत असं काय झाल की त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अशा अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नातेवाईक संतप्त झाले होते. शेवटी सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी मध्यस्थी करुन दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कडक कारवाई करु असं आश्वासन दिलं आहे. या प्रकरणामुळे इतर विद्यार्थ्याचे पालक सुध्दा चांगलेच धास्तावले आहेत.