बहुतांश लोक भावी आयुष्याबद्दल बोलत मोठमोठे प्लान्स करत असतात, पण आपलं आयुष्य किती क्षणभंगुर आहे, एका झटक्याक काय होईल हे कोणालाच माहीत नसतं. आज आपण बसून उद्याबद्दल आणि 25 वर्षआंनी काय करू याची स्वपन रंगवत असतो, मनोरथांचे इमले रचत असतो. पण पुढच्या क्षणाल काय होईल, याची कोणालातरी कल्पना असते का ? असंत काहीस मुंबईत एक विद्यार्थ्यासोबत घडलं आहे. मुंबईतील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’च्या (टीआयएसएस) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्तेत आहे. त्याच टीआयएसएसमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. मित्रांसोबत पार्टी करून झोपायला गेलेला एक विद्यार्थी दुसऱ्या दिवशी उठलाच नाही. मित्रांना थेट दिसला तो त्याचा मृतदेह… त्याच्या अशा अकस्मात मृत्यूने टीआयएसएसमध्ये एकच खळबळ माजली आहे. त्याच्यासबत नेमकं काय घटल सध्या याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सरकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. अनुराग जायस्वाल असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील होता. तो चेंबूर येथील एका इमारतीमध्ये त्याच्या तीन मित्रांसह भाड्याने रहात होता. शनिवारी रात्री अनुराग आणि त्याचे मित्र पार्टीला गेले , तेथे त्यांनी बरीच दारू प्यायली. त्यानंतर ते सगळे झोपले. मात्र रविवारी सकाळी अनुरागला जागच आली नाही, मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रय्तन केला, मात्र त्याने डोळे काही उघडलेच नाहीत. शेवटी त्याच्या मित्रांनी त्याला डॉक्टरांकडे नेलं. तेव्हा डॉक्टरांनी त्याला थेट मृत घोषित केलं. हे ऐकून त्याचे मित्र हादरलेच, त्यांना मोठा धक्का बसला.
पार्टी केली पण उठलाच नाही…
अनुराग जायस्वाल उत्तर प्रदेशातून आला होता. ‘टीआयएसएस’ मध्ये तो एचआर विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत होता. तो शनिवारी रात्री वाशी येथे काही सिनीअर आणि ज्युनिअर विद्यार्थ्यांच्या पार्टीला गेला होता. त्या पार्टीत 150 जण होते , पार्टीदरम्यान अनुराग खूप दारू प्यायला होता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. दारू प्यायल्यानंतर रविवारी पहाटे 3 च्या सुमारास तो घरी आला व रविवारी तो उठलाच नाही. त्याच्या मित्रांनी त्याला डॉक्टरांकडे नेले, तेव्हा त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि चेंबूर पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी गेले. पोलिसांनी त्याच्या मित्रांच्या चौकशीकेली. त्यानंतर पोलिसांनी अनुरागचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला. त्याचा अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण उघडकीस येईल.