एकतर्फी प्रेमातून मुलीचा असा करायचा पाठलाग, लपून गेली तरी हजर व्हायचा? असं फुटलं भांडं

| Updated on: Feb 15, 2023 | 9:13 PM

एकतर्फी प्रेमातून मुलानं केलेली कृती पाहून खळबळ उडाली आहे. 19 वर्षीय तरुणीच्या प्रेमात पडलेल्या युवकाने पाठलाग करण्यासाठी हद्दच ओलांडली. त्याच्या कृतीने वैतागून मुलीने घरच्यांना सांगितलं. त्यानंतर त्याचं भांड फुटलं.

एकतर्फी प्रेमातून मुलीचा असा करायचा पाठलाग, लपून गेली तरी हजर व्हायचा? असं फुटलं भांडं
तरुणी कुठेही गेली तरी मुलगा व्हायचा हजर, तिला कळेना कसं शक्य होतं, मग झालं असं की...
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us on

सूरत : एकतर्फी प्रेमाची अनेक प्रकरणं आतापर्यंत आपण पाहिली आहेत. पण गुजरातच्या सूरतमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हॅलेंटाईन डेपूर्वी एका मुलानं एकतर्फी प्रेमातून मुलीच्या स्कुटीला गुपचूपपणे जीपीएस सिस्टम लावलं होतं. तसेच तिला रोज ट्रॅक करत होता. तरुणी कुठेही गेली तरी मुलगा त्या ठिकाणी काही सेकंदात हजर व्हायचा. सुरुवातीला तरुणीने त्याच्याकडे कानाडोळा केला मात्र त्याचं वागणं विचित्र वाटल्याने तिने याबाबतची माहिती घरच्यांना दिली. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मुलाला ताब्यात घेतल्यानंतर मुलाने तिच्या स्कुटीमध्ये जीपीएस लावल्याची कबुली दिली. जीपीएसच्या माध्यमातून तरुणीला ट्रॅक करत होतो आणि जिथे जाईल तिथे हजर असायचो, असं त्याने सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकुंज पटेल आणि तरुणीची मैत्री इन्स्टाग्रामवर झाली होती.त्यानंतर निकुंज एकतर्फी तिच्या प्रेमात बुडाला होता.निकुंज मैत्रीचं रुपांतर प्रेमात करण्यासाठी प्रयत्नशील होता. यासाठी या ना त्या कारणाने बोलण्याचा प्रयत्न केला.मात्र मुलगी त्याला वारंवार नकार देत होती.

निकुंजने त्यानंतर तिचा पाठलाग करण्यासाठी तिच्याच स्कुटीमध्ये गुपचूपपणे जीपीएस लावलं. तिचा पाठलाग सुरु केला. तसेच तिला वारंवार कॉल करून त्रास द्यायचा. तसेच ती जिकडे जाईल तिथे काही सेकंदात हजर व्हायचा. फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन वीक सुरु झाल्यानंतर मुलगा वारंवार तिचा पाठलाग करू लागला. मुलीने स्कूटर गॅरेज जाऊन तपासल्यानंतर त्याचं भांडं फुटलं. बॅटरीजवळ जीपीएस लावल्याचं दिसलं. त्यानंतर तिने घरच्यांना सांगितलं आणि पोलिसात तक्रार दिली.

कतारगर पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर फुलपाडा माछलीवाड येथे राहणाऱ्या निकुंज पटेला याला छेडछाडीच्या आरोपाखाली अटक केली. पोलीस तपासात कळलं की, त्याने स्कुटीच्या बॅटरीजवळ जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस लावलं होतं. त्यात एक सिमकार्डही होतं. त्या माध्यमातून तो तिचा पाठलाग करायचा. तसेच घराच्या आसपास नसल्यास कॉल करून त्रास द्यायचा. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी निकुंजला अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे.