मुंबई : गोरेगाव पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यातच आता या प्रकरणात संजय राऊतांचे टेन्शन वाढवणारी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील महत्वाच्या दुवा स्वप्ना पाटकर यांच्या आरोपांमुळे राऊत अडचणीत येणार आहेत. स्वप्ना पाटकर(Swapna Patkar ) यांना राऊत कुटुंबियांच्या निकट वर्तीय आहेत. संजय राऊतांविरोधात साक्ष दिल्याने बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला आहे.
पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात स्वप्ना पाटकर यांचा ईडीकडून जबाब नोंदवण्यात आला आहे. हा जबाब राऊत यांचा विरोधातील असल्याने धमक्या येत असल्याचा आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला आहे.
जबाब मागे घेण्यात यावा तसेच तुम्हाला किरीट सोमिया यांनी असे बोलण्यास सांगितले असल्याचा जबाब ईडीला द्या अन्यथा तुमच्यावर बलात्कार करून तुम्हाला जीवे मारण्यात येईल अशी धमकी देण्यात आली असल्याची माहिती पाटकर यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्राद्वारे दिली आहे.
या घोटाळा प्रकरणात जबाब मागे घेण्यासाठी राऊत दबाव आणत असल्याचा आरोप पाटकर यांनी केला आहे. मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पाटणकर यांच्या धमकीची दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश विवेक फणसळकर यांनी वाकोला पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. पाटकर यांनी त्यांना दोन-तीन फोन नंबरवरुन बलात्कार आणि हत्या करण्याची धमकी येत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
एक हजार 34 लाखांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राईत यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या जमिनी खरेदीचे व्यवहार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत आणि सुजीत पाटणकर यांची पत्नी स्वप्ना पाटणकर यांच्या नावाने खरेदी करण्यात आले होते. भूखंडांची किंमत साधारण 60 लाखांच्या आसपास असून स्थानिकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्याचेही आरोप करण्यात आले आहेत .
मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि म्हाडाचा भूखंड आहे. पत्राचाळ विकसित करण्याचं काम प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या चाळीचा काही भाग खासगी विकासकाला विकला असल्याचा ईडीचा आरोप आहे. पत्राचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप प्रवीण राऊत यांच्यावर करण्यात आलाय. प्रवीण राऊत यांच्या गुरु कन्स्ट्रक्शन कंपनीला पत्रा चाळीतील 3 हजार फ्लॅटचं काम देण्यात आलं होतं. त्यापैकी 672 फ्लॅट भाडेकरारासाठी राखीव ठेवण्यात आले होते. बाकी म्हाडा आणि बिल्डर यांच्यात वाटून देण्यात येणार होते. मात्र, 2011 ते 2013 दरम्यान प्रवीण राऊत यांनी चाळीचे अनेक भाग खासगी बिल्डर्सना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.