“तक्रार करणाऱ्याला जेसीबीखाली घ्या;” या अभियंत्याची गुंडगिरीची भाषा

| Updated on: Feb 28, 2023 | 2:51 PM

साहेबाचं म्हणणं वेगळं आणि यांचं वेगळचं. डोकं किर्र झालं. जे बी मध्ये येईल. त्याला जेसीबीखाली घ्यायचं बिनधास्त. मी सांगून चाललोय. काय होईल ते बघू पुढचं पुढं.

तक्रार करणाऱ्याला जेसीबीखाली घ्या; या अभियंत्याची गुंडगिरीची भाषा
Follow us on

बीड : बीडच्या धारूर तालुक्यातील जागीर मोहा येथे धनगर वस्तीवर रस्त्याचं काम सुरू आहे. ग्रामस्थांनी चांगले काम करण्याची मागणी केली. कामाची तक्रार करतात काय? या कामावरील अभियंताने संबंधित ग्रामस्थांना जेसीबी खाली घ्या. त्यांना पुरून टाका. अशा प्रकारचे वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. आता अधिकारीच गुंडगिरीची सीमा पार केल्याचे या व्हिडीओच्या माध्यमातून दिसून येत आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधित अभियंत्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणात संबंधित खात्याचे अधिकारी यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे अभियंत्यांची दुसरी बाजू मात्र समजू शकली नाही.

व्हायरल व्हिडीओत नेमकं काय?

धनगर रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावर जेसीबीचा आवाज येत आहे. या कामाच्या पाहणीसाठी अभियंता आला आहे. त्याच्यासोबत काही जण आहेत. ते त्याला सांगत आहेत की, काम योग्य झालं पाहिजे, असं गावकऱ्यांचं म्हणण आहे. रस्ता अडवायला कोण आला होता. मला त्याचे नाव सांग, असं अभियंता म्हणतो. अडवायला नाही. येथे माती टाकू नका म्हणाले. त्यावर अभियंता म्हणतात, साहेबाचं म्हणणं वेगळं आणि यांचं वेगळचं. डोकं किर्र झालं. जे बी मध्ये येईल. त्याला जेसीबीखाली घ्यायचं बिनधास्त. मी सांगून चाललोय. काय होईल ते बघू पुढचं पुढं. आपल्याला या गोष्टी पटत नाही. आमच्या कामात कुणी हस्तक्षेप करायचा नाही, असं अभियंता सांगत आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

तेवढ्यात सरपंचांचा एक फोन सय्यद यांना येतो. ते त्यांना धनगर वस्तीच्या कामावर सरपंच यांना बोलावतात. या घटनेच्या वेळी संबंधित अभियंता कामाच्या ताणामुळे त्रासलेले दिसतात. त्यामुळे त्यांनी अशी धमकीची भाषा बोलली असल्याची शक्यता आहे. पण, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. अभियंत्यासारखे अधिकारी अशी भाषा बोलत असतील, तर सामान्यांच काय, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे.