Video | मुंबई-आग्रा मार्गावर भीषण अपघात! अपघानानंतर आग, चालक, क्लिनर जिवंत जळाले!

| Updated on: Feb 01, 2022 | 6:09 PM

मुंबई -आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) कंटेनर आणि केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरमध्ये भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. हाडाखेड - पलासनेर गावाच्या परिसारामध्ये हा भीषण अपघात घडला आहे. अपघातातनंतर टँकरला आग लागली, या आगीमध्ये ड्रायव्हर आणि क्लिनरचा जळून मृत्यू झाला आहे.

Video | मुंबई-आग्रा मार्गावर भीषण अपघात! अपघानानंतर आग, चालक, क्लिनर जिवंत जळाले!
टँकर -कंटेनरचा अपघात
Follow us on

धुळे : मुंबई -आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) कंटेनर आणि केमिकल वाहतूक करणाऱ्या टॅँकरमध्ये भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. हाडाखेड – पलासनेर गावाच्या परिसारामध्ये हा भीषण अपघात घडला आहे. अपघातातनंतर टँकरला आग लागली, या आगीमध्ये ड्रायव्हर आणि क्लीनरचा जळून मृत्यू झाला आहे. कंटेनरमध्ये (containers) काही ट्रॅक्टर होते. ट्रॅक्टरच्या टायरने पेट घेतल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. आग पसरल्याने संबंधित टॅंकरने देखील पेट घेतला, या आगीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून, अपघातग्रस्त वाहने जळून खाक झाली आहेत. रसायन वाहतूक करणाऱ्या टँकरमधून उग्र वास येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाहीये.

दोघांचा मृत्यू

घटेनेबाबत अधिक माहिती अशी की, इंदूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकर आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. पळासनेर परिसरामध्ये हा अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये टँकरचा चुराडा झाला असून, अपघातानंतर आग देखील लागली होती. या आगीमध्ये जळून टँकरच्या चालकाचा आणि क्लिनरचा  मृत्यू झाला आहे. मृतांची नावे अद्याप समोर येऊ शकलेली नाहीयेत. तर कंटेनरचा चालक थोडक्यात बचावला आहे.

स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

अपघातानंतर दोनही वाहनांना भीषण आग लागली, नागरिकांकडून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. हा टँकर केमिकल वाहतूक करणारा असल्यामुळे आग लागल्यानंतर टँकरमधून उग्र वास येत होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे पहायाला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार या अपघात दोघांचा मृत्यू झाला असून, वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या

Pune Crime | भ्रष्टाचार, लाचखोरीनंतर आता ‘या’ गंभीर गुन्ह्यांमुळे पोलीसदल बदनाम ; तीन वर्षात पोलिसांवरील गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी आलीसमोर

पेट्रोल न दिल्याच्या रागातून पेट्रल पंपाची तोडफोड; माजलगावमधील धक्कादायक घटना

Pune-Mumbai highway | पुणे-मुंबई महामार्गावर अपघाताचे सत्र थांबेना ; वेगवान कंटेनरवरील चालकाचं ताबा सुटलं अन … ; तीन दिवसांतील तिसरा अपघात