नवी दिल्लीः राजस्थानमधील उदयपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ती घटना ऐकून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला आहे. राजस्थानमधील बावडी जंगल परिसरातील एका सरकारी शाळेतील शिक्षक राहुल मीना आणि महिला सोनू कंवर यांचे नग्नावस्थेत मृतदेह सापडले होते. उदयपूर पोलिसांनी त्या शोध सुरु केल्यानंतर अनैतिक संबंध किंवा ऑनर किलिंगच्या प्रकारातून हा खून झाल्याचे पोलिसांनी संशय व्यक्त केला होता. तपास केल्यानंतर या दोघांची हत्या अनैतिक संबंधातून आणि अंधश्रद्धेतून झाल्याचे स्पष्ट झाले होते.
मात्र हा प्रकार आरोपी भोंदूबाबा भालेश कुमार याला ताब्यात घेतल्यानंतर या खूनाचा उलगडा झाल्याचे सांगण्यात आले.
पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी सांगितले की, भोंदूबाबा भालेश कुमारला या हत्याप्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर आणि कसून चौकशी केल्यानंतर त्यानेच या दोघांची हत्या केल्याचे सांगितले.
भावेशने सांगितले की, तो भादवी गुडामधील एका मंदिरात राहतो. आणि अडचणीत सापडलेल्या लोकांना तो गंडेदोरे देत होता. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, सोनू आणि राहुल मंदिरात भेटले होते. त्यानंतर ती दोघं प्रेमात पडली होती, त्यातूनच त्यांचे अनैतिक संबंध आले होते. त्यानंतर ही दोघंही भोंदूबाबा भालेशच्या संपर्कात आली होती.
त्यानंतर या दोघांनी लग्न केले होते. मात्र काही दिवसांनी या दोघांमध्ये वाद वाढत गेले. त्यामुळे राहुल आणि सोनू यांनी भोंदूबाबाची भेट घेतली. त्यांच्या या संधीचा फायदा घेत.
भोंदूबाबाने या दोघांमध्ये भांडण लावण्यास सुरुवात केली. हा प्रकार या दोघा पती-पत्नींच्या लक्षात आल्याचे भोंदूबाबाच्या लक्षात आले. त्याने आपली बदनामी होऊ नये म्हणून त्याने पती-पत्नीला जंगलात बोलवून त्यांना वाद मिठवण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले.
त्यावेळी भोंदूबाबाने 50 फेव्हीक्विकच्या ट्यूब एकत्र करुन त्याने या दोघांच्या शरीरावर त्याचा लेप लावला. आणि त्या दोघांची हत्या केली. काही दिवसांनी या दोघांची नग्नावस्थेत सापडलेल्या मृतदेहावरुन हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.