सांगली : सांगलीच्या तासगाव कवठेमहांकाळ राज्य महामार्गावर मणेराजूरी पवार वस्तीजवळील वळणावर वारकऱ्यांना घेवून जाणारा टाटा टेम्पो (Tata Tempo) उलटल्याची घटना घडली आहे. आज दुपारी झालेल्या अपघाता (Accident)मध्ये 8 ते 10 वारकरी गंभीर जखमी (Injured) झाले असून त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्वजण शिराळा तालुक्यातील भागाईवाडी व परिसरातले आहेत. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वळणावर टेम्पो पलटी झाला. यात काही भाविक जखमी झाले असले तरी सुदैवाने कुणाचाही मृत्यू झाला नाही.
पंढरपूरहून आषाढी एकादशी यात्रा संपवून वारीतील सुमारे 33 भाविकांना घेवून टाटा टेम्पो हा बत्तीस शिराळा येथे चालला होता. परंतु पवार वस्तीजवळील वळणार चालकाचा वाहनावरील ताबा सुटून हा टेम्पो पलटी झाला. यामध्ये टेम्पोमधील महिला आणि पुरुष वारकरी एकमेकांच्या अंगावर पडले. काही टेम्पो बाहेर फेकले गेले. यामध्ये सुमारे 8 ते 10 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने तासगाव, मिरज, सांगली येथील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
बेलापूरवरून वाशीच्या दिशेने जात असताना नियंत्रण सुटल्याने नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर कारचा भीषण आपघात झाल्याची घटना घडली आहे. कार जोरदार डीव्हायडरवर आदळली. यामध्ये कार चालक गंभीर जखमी असून त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. कारचेही मोठे नुकसान झाले आहे. जिग्नेश गुप्ता असे जखमी कार चालकाचे नाव आहे. पाम बीच मार्गावर करावेच्या मार्गावर अतिवेगात असलेल्या कारचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. होंडा सिटी कंपनीची गाडी होती. (Tata Tempo overturns in Sangli, 8 to 10 Warkaris seriously injured in accident)