नवी दिल्ली : मुलांचे उज्वल भविष्य घडवण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षक पार पाडत असतात. विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देऊन देशासाठी चांगली पिढी निर्माण करण्याचे काम शिक्षक करतात. पण याच शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मनीष पांडेय नावाचा शिक्षक आपल्या विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी तिच्या घरी जात होता. काही दिवसानंतर त्या शिक्षकाने विद्यार्थीनीच्या आईवर बलात्कार केला. इतकंच नाहीतर नराधमाने त्याचा व्हिडीओही बनवला. धक्कादायक घटना समोर समोर आली आहे.
ही घटना उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्हात घडली. आरोपी मनीष पांड्ये या शिक्षकाने आपल्याच विद्यार्थिनीच्या आईवर बलात्कार करत घटनेचा व्हिडीओ बनवला. ही घटना घडल्यानंतर पीडितेने तक्रार दाखल केली. आरोपीने पीडितेच्या मुलीसोबतही छेडछाड केली. पोलिसांनी आरोपी शिक्षकालाअटक केली असून पुढचा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, देशात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. पोलिसांचा धाक न राहिल्याने समाजात उघडपणे गुन्हेगार भरदविसाही गुन्हे करत आहेत. चोरी, दरोडे, खून, बलात्कार, विनयभंग अनेक घटना रोज कानावर येत असतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गुन्हेगारी करणारे 18 ते 24 वयोगटातील तरुणांची संख्या अधीक आहे. या वयातील मुलांना समोउपदेशनाची गरज असल्याचं पोलिसांनी सांगितलं.