मुंबई : चेंबूरमध्ये (chembur crime news) एक भयानक प्रकार घडला आहे, त्यामुळे चेंबूरमधील नागरिकांना संताप व्यक्त केला आहे. 13 वर्षीय तरुणीवर तिच्या 19 वर्षीय मित्राने महिनाभर दारूच्या नशेत वारंवार बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्यावेळी हा प्रकार पोलिसांना (mumbai police) समजला, त्यावेळी त्यांना या प्रकरणातील गांभीर्य समजले. विशेष म्हणजे मुलगी घरी मे महिन्यात एकटी असताना हा प्रकार घडला आहे. ज्या तरुणावरती बलात्काराचा (Mumbai Crime news in marathi) आरोप झाला आहे, त्याला मुलीचे कुटुंबीय ओळखत होते. त्यामुळे त्याला घरात प्रवेश होता. त्याचबरोबर तरुणाने त्यांच्या घरातून काही वस्तू देखील चोरल्या आहेत.
मे महिन्यात पीडित मुलीचे आईवडील कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ज्यावेळी पोलिसांनी त्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले, त्यावेळी सत्य उजेडात आलं आहे. तो मुलगा त्या मुलीला भेटायचा.
तिला दारू पाजायचा, ज्यावेळी ती अर्ध-बेशुद्ध अवस्थेत जाईल, त्यावेळी तिच्यावर बलात्कार करायचा अशी माहिती पोलिसांनी सांगितली आहे.
मुलीच्या घरातून काही रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे तिच्या पालकांच्या लक्षात आले. काही वस्तू चोरीला गेल्याचं ज्यावेळी मुलीच्या आईवडिलांना तिला विचारलं, त्यावेळी मुलीने घरात झालेला सगळा प्रकार तिच्या आईवडीलांच्या कानावर घातला. त्यानंतर तात्काळ पालकांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय चाचणी केली, त्यानंतर तरुणाला ताब्यात घेतलं. तरुणाने गुन्हा केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. तरुणाला मोबाईल खरेदी करायचा असल्यामुळे त्याने चोरी केली असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे.
त्या तरुणाची पोलिस कसून चौकशी करीत आहे. त्याचबरोबर त्याने अजून असा कुठे प्रकार केला आहे का ? याची सुध्दा चौकशी करणार आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीच्या आईवडीलांना मोठा धक्का बसला आहे. तरुणावरती पोलिसांनी बलात्कार, चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.