हैदराबाद : तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात (Telangana Accident) ट्रक आणि ट्रॉलीची (Truck Accident) समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 8 जण ठार झाले असून 17 जण जखमी झाले आहेत. एल्लारेड्डी मंडलच्या हसनपल्ली गेटजवळ सुमारे 26 प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटो ट्रॉलीला वेगवान ट्रकने जोरदार धडक दिली होती.
या भीषण अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जणांचा रुग्णालयात नेत असताना आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुमारे 17 जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
Nation is Distraught by the loss of lives due to an accident in Kamareddy, Telangana
PM Sh @narendramodi responded & extended financial aid to victims & their families
KCR,the CM of this state is always miles away from responding, of course being his usual SELF,feudal in Nature pic.twitter.com/LspwOFzEfP
— Arvind Dharmapuri (@Arvindharmapuri) May 9, 2022
हे सर्व जण पितलाम मंडलातील चिल्लर्गी गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. एल्लारेड्डीहून आपल्या गावी परतत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिल्याने त्याचा अपघात झाला.
लच्छव्वा, देववैया, कमसव्वा, केशैया आणि ऑटो ट्रॉली चालक साययुलू अशी मृतांची नावे आहेत. भरधाव ट्रकच्या धडकेमुळे ऑटो ट्रॉली चालकाचा मृतदेह वाहनात अडकला आणि मृतदेह ढिगाऱ्यातून काढण्यासाठी पोलिसांना कटरचा वापर करावा लागला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
दुसरीकडे, अपघातात बाईकस्वाराला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील हैदराबाद शहरात दुंडीगल भागात ट्रक आणि बाईकचा अपघात झाला. डाव्या बाजूने कट मारुन पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना ट्रकने बाईकला धडक दिली. त्यानंतर ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. या अपघाताचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.