सोशल मीडियात केलेल्या पोस्टमुळे तुफान राडा झाल्याचं तेलंगणामध्ये पाहायला मिळालं. तेलंगणाच्या (Telangana News) आदिलाबादमध्ये शनिवारी रात्री सोशल मीडियावर एक पोस्ट (Social Media Post) केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. या पोस्टमुळे एका विशिष्ट समुदायातील लोकांनी वन टाऊन पोलीस स्टेशनच्या समोर निदर्शनं करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अखेर लाठीचार्ज केला. यावेळी एकच गोंधळ उडाला. काहींना यात पोलिसांचे (Telangana Police) फटके खावे लागलेत. दरम्यान, लाठीचार्जनंतर सैरावेरा पळत लोकांनी धूम ठोकली. ज्या व्यक्तीने केलेल्या फेसबुक पोस्टमुळे हे सगळं प्रकरण झालं, त्याला अटक करण्यात आली आहे. तसंच त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
#WATCH | Adilabad, Telangana: Police resort to lathicharge to disperse the crowd that was protesting in front of One town police station over a social media post pic.twitter.com/5rFutwLRi5
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) June 11, 2022
पोलीस अधिक्षक डी. उदय कुमार रेड्डी यांनी म्हटलंय, की सोशल मीडियामध्ये करण्यात आलेल्या पोस्टमुळे काही लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या होत्या. यामुळे आम्ही याप्रकरणी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवून घेत त्याला अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी केली जातेय.
पोलीस अधिकाऱ्यांनी लोकांना शांतता बाळगण्याचं आवाहन केलंय. कायदा कुणीही हातात घेऊ नये, असंही पोलिसांनी म्हटलंय. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला, असंही पोलिसांनी नमूद केलंय.
दरम्यान, लोकांनी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, तर कर्फ्यू लावला जाईल, असा इसारा देखील देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशभरात भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवरुन वातावरण तापलंय. अनेक ठिकाणी निदर्शनं आणि आंदोलनं केली जात आहेत.