एक दहा वर्षांचा मुलगा अंघोळ (Bathing) करत होता. नदीत अंघोळ करत असतेवेळी या मुलावर मगरने (Attacked by Crocodile) झडप घालून हल्ला केला. या हल्ल्यात मगरीने दहा वर्षांच्या मुलाला ओढून नदीन खोल नेलं आणि त्याचा फडशा पाडला. दहा वर्षांच्या मुलाला या मगरीने जिवंत गिळलं. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये (Chimbal River, Madhya Pradesh) घडली. मध्य प्रदेशच्या शोपूपमध्ये घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली होती. मात्र ही घटना इथेच संपत नाही खरा थरार तर यापुढे घडला. चिंबल नदीत अंघोळ करताना दहा वर्षांच्या चिमुकल्याला महाकाय मगरीने गिळल्याचं वृत्त वाऱ्यासारखं संपूर्ण गावभर पसरलं. त्यानंतर संपूर्ण गावाने जे कृत्य केलं, ते अंगावर काटा आणणारं होतं. संपूर्ण गाव एकवटला. चिंबल नदीमध्ये ही घटना घडली होती. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर गावातील लोकांनी नदीत मगरीचा शोध घेतला. तिला नदीतून बाहेर काढलं आणि आक्रोश सुरु केला. हा सगळा प्रकार अत्यंत थरारक होता. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. इंडियाटुडेनं याबाबतचं वृत्त दिलंय.
स्थानिक गावकऱ्यांनी दहा वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनंतर मगरीशीच दोन हात केले. या मगरीला नदीतून शोधलं आणि तिला नदीतून बाहेरही काढलं. जाळ्या, दोरखंड, काठ्या या सगळ्याच्या मदतीने गावातील लोकांनी मगरीला पकडलं. मगरीला नदीतून बाहेर काढतानाहा हा सगळा थरार कॅमेऱ्यातही कैद झाला. यानंतर या मगरीला गावातील लोकांनी कैद करुन ठेवलं होतं.
दहा वर्षांच्या मुलाच्या आईवडिलांना आपला मुलगा मगरीच्या पोटात जिवंत असेल, अशी भाबडी आशा होता. जेव्हा मगर आपल्या मुलाला तोंडातून बाहेर काढेल, तेव्हा आम्ही मगरीला सोडू, अशी भूमिका गावातल्या लोकांनी घेतली होती. सोमवारी सकाळपासून सुरु झालेला हा थरारक प्रकार संध्याकाळी उशिरापर्यंत सुरुच होता. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी बचावकार्य मगरीला रेस्क्यू करण्यासाठी धाव घेतली.
ज्या मगरीने गावातील दहा वर्षांच्या मुलाला जिवंत गिळलं, तिला पकडण्यासाठी अख्खा गाव एकवटला! मध्य प्रदेशातील चिंबल नदीमध्ये मगरीला पकडण्याचा थरार… व्हिडीओही समोर… pic.twitter.com/cypxNqhbL9
— Siddhesh Sawant (@ssidsawant) July 12, 2022
रघुनाथपूर येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा वर्षांचा चिमुरडा हा नदीत खोल अंघोळीसाठी गेला. तेव्हा मगरीने त्याच्यावर हल्ला केला. या मुलाला मगरीने जिवंत गिळलं. गावातील लोकांना याबाबत कळल्यानंतर त्यांनी मगरीला शोधलं आणि तिला बाहेर काढून पकडून ठेवलं होतं. याबाबत कळल्यानंतर मगरींना जीवदान देणाऱ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.