वाशिम – औरंगाबाद (Aurangabad) द्रुतगती महामार्गावर मंगरूळपीर तालुक्यातील पेडगाव (Pedgaon) फाट्यावर बोलेरो आणि क्रूझरचा अपघात झाल्याची घटना मध्यरात्री 2 वाजता घडली. यामध्ये 11 जण जखमी झाले असून, 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अकोला येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान पुण्यावरून नागपुरकडे (Nagpur) जाणाऱ्या बोलरो पिकअपने विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रुझरला जबर धडक दिली. यामध्ये क्रुझर व बोलरो पिकअप मधील असे 11 जण जखमी झाले. त्यामधील 6 जण गंभीर जखमी आहेत. यावेळी तत्काळ श्रीमती. साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने वेळीच घटनास्थळी पोहचून जखमीना मदत केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाला आहे.
देशात अनेकदा रात्रीचे अपघात होण्याचं प्रमाण अधिक त्यामुळे अनेक प्रवासी रात्री प्रवास करणं टाळतात. आत्तापर्यंत चालकाला अंदाज न आल्याने बरेच अपघात झाले आहेत. त्याचबरोबर पुढच्या गाडीच्या लाईटमुळे न दिसल्यामुळे देखील अपघात होतात. काल झालेला अपघात हा अत्यंत भीषण होता. दोन्ही सुसाट गाड्या समोरसमोर धडकल्या आहेत. त्यामुळे गाडीत असलेले अकरा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी सहा प्रवासी अत्यंत गंभीर असल्याचे समजले आहे. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना जवळच्या अकोल्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही वाहनांची पाहणी केली आहे. तसेच दोन्ही वाहनं रस्त्याच्या एका बाजूला घेतली आहेत.
अमरावती जिल्ह्यात पाच महिन्यात 163 अपघाती मृत्यू झाले आहेत. यंदाच्या पहिल्या पाच महिन्यात २८१ अपघात अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामध्ये 95 टक्के वाहनचालक पुरुषांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक 36 मृत्यू मार्च महिन्यात झाले आहेत. २०२१ च्या तुलनेत सध्या रस्ते अपघातामध्ये वाढ झाली आहे.
अनेकदा रस्ता खराब असल्याने मृत्यू होतो. तसेच चालकाचा गाडीवरीत ताबा सुटल्याने अपघात होतो.