नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील अपघाताची ( Accident ) मालिका सुरूच आहे. बुधवारी इगतपुरीजवळील पंढरपूरवाडी समोर भीषण अपघात झाला आहे. या अपघातातील एकाच कुटुंबातील चार जणांचा अपघाती मृत्यू ( Family Death ) झाला आहे. यामध्ये एका लहान मुलींचा महिलेचा आणि दोन पुरुषांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असतांना हा अपघात झाला आहे. यामध्ये भरधाव वेगाने चाललेली कारचे पुढील टायर फुटल्याने कार डिव्हायडरवर जाऊन आदळली आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रेनवर जाऊन आदळली. हे क्रेन देखील एका अपघात झालेल्या कारला नाशिकच्या दिशेने घेऊन जात होते.
दुपारी चार वाजेच्या दरम्यान झालेल्या या अपघात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अद्याप पर्यन्त मृतांची ओळख पटलेली नव्हती. मात्र, त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते.
तर जखमी असलेल्या एका व्यक्तीला नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की जाणारे-येणारे लोकं अपघातस्थळी थांबून पाहताच त्यांच्या अंगावर काटा येईल असे दृश्य होते.
कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. त्यामध्ये कारची पुढील बाजू पूर्णतः निकामी झाली आहे. रस्त्यावर अक्षरशः काचांचा पटारा पडलेला होता. सोबत रक्त ही मोठ्या प्रमाणात पडलेले होते.
ही संपूर्ण परिस्थिती पाहून प्रत्येक जण हलहळ व्यक्त करत होता. अपघात पाहून अनेकांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले होते. कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाला असला तरी दुसरीकडे अपघाताबाबत पुढील तपास केला जात आहे.