ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीची तलवार नाचवत दहशत, कोल्हापूरच्या राधानगरी भागातली घटना; व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Feb 05, 2022 | 11:46 AM

धनश्री भोईटे या राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावातीला ग्रामपंचायतीच्या सदस्या आहेत. आरोपी राजेंद्र भोईटे हे त्याचे पती आहेत.

ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीची तलवार नाचवत दहशत, कोल्हापूरच्या राधानगरी भागातली घटना; व्हिडीओ व्हायरल
घटनास्थळी नागरिकांची झालेली गर्दी
Follow us on

मुंबई – कोल्हापुरात (kolhapur) एका ग्रामपंचायत सदस्याच्या पतीने तलवार दाखवत दहशत केल्याचा व्हिडीओ व्हायरल (viral video) झाला आहे. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की, राधानगरी (radhanagari) तालुक्यात त्याची चर्चा सुरू आहे. हे नेमकं कृत्य का केलं किंवा काय कारण आहे या संपुर्ण प्रकरणाची कोल्हापूर पोलिस तपास करत आहेत. आरोपीचं नाव राजेंद्र भोईटे असं असून तो ग्रामपंचायत सदस्यांना धमकावताना दिसतं आहे. सदर घटना तिथल्या सीसीटिव्हीमध्ये कैद झाली असून राजेंद्रला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय. हा प्रकार घटनास्थळी सुरू असताना अनेकांनी त्याला तिथं समजावण्यचा प्रयत्न केल्याचे दिसतंय, परंतु तो कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थित नव्हता. तसेच तिथं जर त्याच्याकडून रागाच्याभरात अनुचित प्रकार घडला असता असं वाटतंय. परंतु आरोपी राजेंद्र भोईटे यांना समजवण्यात जमावातल्या काही लोकांना यश आल्याचे व्हिडीओत पाहावयास मिळत आहे.


व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद

धनश्री भोईटे या राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावातीला ग्रामपंचायतीच्या सदस्या आहेत. आरोपी राजेंद्र भोईटे हे त्याचे पती आहेत. त्यांनी काही किरकोळ कारणावरून ग्रामपंचायतीच्या परिसरात तलवार नाचवत दहशत निर्माण केल्याचे पाहायला मिळत आहे. नेमकं काय झालं होतं ? किंवा काय असं कारण होतं की तलवार नाचवावी लागली याबाबत अद्याप कोणतंही कारण उजेडात आलेलं नाही. त्यामुळे घडलेला प्रकार अत्यंत भयानक होता असं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. तसेच या घटनेचा व्हिडीओ सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकांच्या मोबाईलमध्ये फिरत असल्याची चर्चा आहे. त्यानंतर राजेंद्र भोईटे यांच्या विरोधात राधानगरी या तालुक्याच्या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

तलवारीने केक कापणे, एखाद्या कार्यक्रमात तलवार नाचवणे, दहशत माजवणे असे प्रकार सर्रास उघडकीस येतात. परंतु अशा घटनांनरती पोलिस वॉच ठेऊन असतात. असे प्रकार समाजात घडू नये, कारण त्यामुळे समाज्यातलं वातावरणं दुषित होतं. कोल्हापुरात व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळं तिथल्या परिसरात घबराहट पसरल्याचं चित्र आहे. कारण तो व्हिडीओ तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. वेळीत राजेंद्र भोईटे यांना आवर घालण्यात तेथील नागरिकांना यश आलं नाहीतर अनुचित प्रकार घडला असता. सद्या राजेंद्र भोईटे हा राधानगरी पोलिसांच्या ताब्यात असून पोलिस त्याची कसून चौकशी करीत असल्याची माहिती मिळत आहे.

Building Slab Collapse| येरवड्यातील बांधकाम दुर्घटनेप्रकरणी बांधकाम व्यवसायिकावर गुन्हा दाखल ; जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार चौकशी

Pimpri Chinchwad crime | लोणावळा पोलिसांच्या सर्तकतेमुळं टळला दरोडा; कारवाई करत चौघांना केले जेरबंद , ‘या’ वस्तू केलया जप्त

Pune Building Slab Collapse Live : पुणे स्लॅब कोसळून दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त