राज्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. नराधमांना कायदा सुव्यवस्थेचा अजिबात धाक राहिलेला नाही. दिवसेंदिवस या घटना वाढत चालल्या असून ठाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील भाईंदरमध्ये एकाने शेजाऱ्याच्या घरात घुसून त्याच्या पत्नीला ओढणीने बांधून बलात्कार केला. या घटनेने खळबळ उडाली असून पीडित महिलेने दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.
आरोपी रात्री 11च्या सुमारास शेजाऱ्यांच्या घरात बळजबरीने घुसला. त्यावेळी घरात 38 वर्षीय पीडित महिला आणि तिची तीन वर्षांची लहान मुलगी होती. आरोपीने पीडितेचे ओढणीने हात-पाय बांधले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेवर तिच्या लहान मुलीसमोरच आरोपीने अत्याचार केला. आरोपीने तिच्यावर हल्लाही केल्याची माहिती भाईंदर पोलिसांनी दिली आहे. महिलेने दुसऱ्या दिवशी पोलिसात धाव घेतली आणि आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला गेला असून पोलिसांनी अटक केल्याची माहिती समजत आहे. भारतीय न्याय संहितेनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या तीन आठवड्यांधी ठाण्यामधून बलात्काराची घटना समोर आली होती. 28 वर्षीय आरोपीने 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवत अनेकवेळा बलात्कार केला होता. ज्यावेळी अल्पवयीन मुलीले शरीर संबंध ठेवण्यासाठी नकार दिला त्यानंतर आरोपी मुलाने तिला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पीडित मुलगी पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तरूणाविरूद्ध गुन्हास दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.