ठाणे | 23 ऑक्टोबर 2023 : ठाण्यातून एक खळबळजनक घटना (thane crime) समोर आली आहे. शहरात एका 29 वर्षांच्या वेल्डरची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. आसपासच्या भागात राहणारे लोक धास्तावले आहेत. खरंतर त्या वेल्डरला त्याच्याच ओळखीच्या इसमाने मारलं, पण त्यामागचं कारण जाणून तुम्हीही हादराल.
आरोपीने त्या वेल्डरकडे दारू (alcohol) पिण्यासाठी पैसे मागितले, पण त्याने त्याला पैसे देण्यास थेट नकार दिला. त्यामुळे आरोपी संतापला आणि चाकून हल्ला केला. सोमवारी याप्रकरणी पोलिसांनी माहिती दिली. श्रीनगर पोलिस स्टेशनचे निरीक्ष किरण कुमार यांच्या सांगण्यानुसार रविवारी दुपारी एकच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
आरोपी आणि मृत इसम एकाच भागात रहायचे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत इसम आणि त्याच्यावर हल्ला करणारा आरोपी हे दोघेही वागळे इस्टेट येथील रामनगर भागात रहायचे. घटनेच्या दिवशी वेल्डर हा कामासाठी बाहेर पडला. तेव्हाच 32 वर्षीय आरोपीशी त्याची रस्त्यात भेट झाली.
नशेत होता आरोपी
आरोपी हा ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि त्याच भागात राहतो. रविवारी दुपारी तो बाहेर पडला तेव्हा दारूच्या नशेत होता आणि त्याला आणखी दारू पिण्यासाठीच पैसे हवे होते. पीडत इसम त्याला भेटल्यानंतर आरोपीने त्याच्याकडे थोडे पैसे मागितले माहे त्र त्याने पैसे देण्यास नकार दर्शवला.
हे ऐकून आरोपी संतापला आणि त्याने त्याच्या शरीरावर चाकूने थेट वार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडित इसमाचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी तो सरकारी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळी पडलेला, रक्ताने माखलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांनी केली अटक
त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकून अटक केली. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंतर त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायाधीशांनी त्याला 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.