ठाणे महापालिकेची बदनामी करणे महागात पडले, राजकीय कार्यकर्त्याला अटक

| Updated on: May 31, 2023 | 12:27 PM

ठाणे महापालिकेची बदनामी करणे एका राजकीय कार्यकर्त्याला चागंलेच महागात पडले आहे. सदर कार्यकर्त्याची थेट कोठडीत रवानगी झाली आहे.

ठाणे महापालिकेची बदनामी करणे महागात पडले, राजकीय कार्यकर्त्याला अटक
ठाणे महापालिकेची बदनामी करणाऱ्या कार्यकर्त्याला अटक
Image Credit source: Tv9
Follow us on

 ठाणे : ठाणे महापालिकेची बदनामी केल्याप्रकरणी एका राजकीय कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. अजय जया असे अटक कार्यकर्त्याचे नाव आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने एका दुकानावर कारवाई केल्यानंतर अजय जया याने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री यांच्या कुटुंबियांचे नाव घेतल्यानंतर प्रशांत कॉर्नरच्या मालकांनी स्पष्टीकरण दिले. यात मुख्यमंत्री यांचा काही संबंध नसल्याचे आणि पालिकेची बदनामी बदनामी केल्याप्रकरणी अजय जया याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. अजय जेया हा धर्मराज्य पक्षाशी संबंधित असून, त्याच्यावर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. यापूर्वी मिठाईच्या दुकानाच्या मालकाच्या तक्रारीच्या आधारे मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांची बदनामी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अजयने पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर आरोप केला

ठाण्यातील प्रशांत कॉर्नर या स्वीट मार्टचे बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. यानंतर यात मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांचा सहभाग असल्याचा दावा अजयने केला होता. मात्र प्रशांत कॉर्नरच्या मालकांनी स्पष्टीकरण देत, यात मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नसल्याचे सांगितले. यानंतर नागरी संस्थेची बदनामी केल्याच्या आरोपावरून नौपाडा पोलिसांनी अजय जया या राजकीय कार्यकर्त्याला मंगळवारी पहाटे अडीच वाजता अटक केली आहे. कलम 500 बदनामी, 505(2), 120B (गुन्हेगारी कट) आणि 109 (कोणत्याही गोष्टीला उत्तेजन देणे) अंतर्गत हा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी न्यायालयाने अजय जया याला 15 दिवसाची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक महापालिका आयुक्तांच्या तक्रारीच्या आधारे जयाविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त यांनी आरोप केला आहे की, अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून नागरी कर्मचार्‍यांनी मिठाईचे दुकान आणि इतर शेजारील दुकानांचे अतिक्रमण देखील हटवले. पण जयाने सोशल मीडियावर ‘प्रक्षोभक बाब’ पोस्ट केली. यात म्हटले की, टीएमसीने मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्याचा समावेश असलेल्यांनी सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे. अशा प्रकारे, राजकीय फायद्यासाठी टीएमसीने कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा