ठाणे : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. तशा अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी धाडसी कारवाई करत 3 दुचाकी चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण दहा दुचाकी जप्त केल्या असून या सर्व दुचाकींची किंमत बाजारमूल्यानुसार 5 लाख 75 हजार 500 रुपये इतकी आहे. (Thane Shahapur police arrested Three bike thieves confiscated Ten bike)
मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील शहापूर परिसर तसेच वाडा, कल्याण, पडघा, भिवंडी आणि कल्याण बायपास या भागात दुचाकी चोरीच्या अनेक घटना समोर आल्या. तशा तक्रारी नागरिकांनी पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत. बेमालूमपणे चोरी करणाऱ्या चोरट्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. तसेच दुचाकी चोरणारे चोरटे पकडले जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, शहापूर पोलिसांना आपल्या गुप्तहेरांच्या माध्यमातून प्रकाश हिलम, (साठगाव), अजय दळवी, (धसई) सागर घाटकर (कलमगांव) या तीन आरोपींबद्दल समजले. त्यानंतर सापळा रचून शहापूर पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले. हे तिन्ही आरोपी शहापूर तालुक्यातील आहेत.
पोलिसांनी आपल्या कारवाईमध्ये या तीन आरोपींजवळ असलेल्या हिरो, होंडा आणि बजाज कंपनीच्या एकूण दहा दुचाक्या ताब्यात घेतल्या आहेत. जप्त केलेल्या या दुचाकींची किंमत सध्याच्या बाजारमूल्यानुसार अंदाजे 5 लाख 75 हजार 500 रुपये इतकी आहे.
दरम्यान, या तिघांच्या अटकेनंतर ठाणे जिल्हा तसेच शहापूर तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पोलीस या आरोपींची चौकशी करत आहेत. या आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या दुचाकी चोरी झालेल्या नागरिकांनी शहापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन शहापूर पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी केले आहे. याप्रकरणी अधिक तपास सपोनि श्रीकांत जाधव आणि शहापूर पोलीस हे करीत आहेत.
इतर बातम्या :
बायको नसताना फेसबुक फ्रेण्डला घरी बोलावलं, तासाभरात जे घडलं, त्याने तरुणच हादरला
मद्यधुंद रुग्णासह चौघांचे महिला-पुरुष डॉक्टरांशी असभ्य वर्तन, केबिनची तोडफोड
नातेवाईकासोबत प्रेम प्रकरणाचा राग, भावाकडून बहिणीची गळा दाबून हत्या
(Thane Shahapur police arrested Three bike thieves confiscated Ten bike)