Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील नामपूर-सटाणा रोडवर घडलेल्या एका खुणाच्या (Murder) घटणेने खळबळ उडाली आहे. दोन कामगारांनी (Worker) आपल्या मुकादमाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून हा खून झाल्याची माहिती समोर येत असून वायरने गळा आवळून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. जायखेडा पोलीस (Jaykheda Police) ठाण्यात दोन संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार बाजार समितीचे संचालक आणि प्रसिद्ध कांदा व्यापारी असलेल्या सचिन मुथा यांच्या कांदा शेडमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपींना अटक केली आहे.
बुधवारी ही खुनाची घटना घडली असून गुरुवारी खुनाची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मुकादम असलेले शिवानंद कामत यांची हत्या झाली आहे.
आधी शिवानंद कामत यांना मारहाण झाल्यानंतर त्यांचा इलेक्ट्रीक वायरने गळा आवळून खून केल्याची माहिती समोर आली आहे.
कांदा व्यापारी सचिन मुथा यांनी पोलीसांना दिलेल्या माहितीवरुन अधिक तपास सुरू जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहे.
कांदा व्यापारी मुथा यांच्याकडे मयत आणि कामगार हे कामाला होते. मुकादम आणि कामगार यांच्यात दोन हजार रुपयांवरुण वाद असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत जायखेडा पोलीसांनी विकासकुमार, अनिलकुमार या दोघांना अटक केली असून पुढील तपास केला जात असून पंचक्रोशीत या घटणेने खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी आणि कामगार यांच्यामध्ये देखील या घटनेची माहिती पसरली आहे. पैसे देण्याच्या कारणावरुन खून झाल्याने चर्चा होत आहे.