भोपाळ, मध्य प्रदेशात एका तांत्रिकाने (Bogus Tantrik) शिक्षिकेसोबत अनेकवेळा बलात्कार (Raped) केल्याची घटना समोर आली आहे. भूत उतरविण्याच्या नावाखाली तो अनेक वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही तर कथित तांत्रिकाने झपाटलेल्या भूतापासून मुक्ती देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केली. तांत्रिकाने शिक्षिकेला सांगितले की तुमच्या शरीरात भूत आहे. यासाठी शरीर शुद्ध करावे लागेल. शारीरिक संबंध करून मंत्रांचे पठण केले जाईल. पीडितेने सांगितले की माझे मन हरपले जायचे. यादरम्यान त्याने अनेकवेळा बलात्कार केला. शिक्षिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फरार तांत्रिकाच्या शोधात पोलीस सतत छापेमारी करत आहेत.
हे प्रकरण खंडवा जिल्ह्यातील आहे. येथे राहणारी एक शिक्षिका (30) सन 2019 पासून त्वचेच्या समस्येने त्रस्त होती. डॉक्टरांच्या औषधांचा काहीही परिणाम होत नसल्याने शिक्षिका कथित तांत्रिकाच्या भूलथापांना बळी पडली. पीडित शिक्षिकेने सांगितले की, वडीलही खूप दिवसांपासून आजारी आहेत, मलाही त्वचेच्या समस्येने त्रास होतो. मला एका मित्राने सांगितले की शशिकांत हा पोहोचलेला बाबा आहे. तो तांत्रिक कृतीने त्रास दूर करेल. त्यानंतर ती शशिकांतला भेटायला घरी गेली.
मांत्रिकाने पीडितेला घाबरवले की तुझ्या घरात भूत आहे. त्याला पळून लावावे लागेल. घरी पूजा करावी लागेल. मांत्रिकाने पीडितेच्या घरी आणि ओंकारेश्वरच्या घाटावर तांत्रिक उपक्रमांच्या नावाखाली चौकी उभारली. मंत्र वाचले, पण प्रश्न सुटला नाही. शिक्षिकेचा आजार बरा झाला नाही, मग तो म्हणाला, तुझ्या अंगात जिन आहे, त्याला हाकलण्यासाठी शारीरिक संबंध करावे लागतील. तांत्रिकाने तिचे अनेकवेळा लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यासह चार लाख रुपये देखील हडप केले.
जादूटोण्याच्या जाळ्यात अडकलेल्या पीडितेला सर्वस्व गमावल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पीडितेने पैसे मागितले असता तांत्रिकाने तिला धमकावले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तांत्रिकाने तिला ॲसिड टाकून जाळण्याची धमकी दिली.
याप्रकरणी सीएसपी पूनम चंद यादव यांनी सांगितले की, आरोपी तांत्रिक हा चिरा खान येथील रहिवासी असून त्याचे नाव शशिकांत सामरे आहे तो व्यवसायाने प्लंबर आहे. तांत्रिक कृती करून त्यांच्या अडचणी दूर होतील, असा दावा ते लोकांसमोर करायचा. पीडिताही तिच्या आजाराच्या समस्येबाबत तांत्रिकाच्या भानगडीत पडली. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपीच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. आरोपीच्या आईची चौकशी सुरू आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे.