जबलपूर : बेवफाई नही करने का म्हणत एका माथेफिरु प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये उघडकीस आली आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर त्याने व्हिडिओ बनवत त्याने धोका दिल्यास काय होते हे व्हिडिओमध्ये दाखवले आहे. व्हिडिओमध्ये शिवीगाळ करत तो रक्ताने माखलेला प्रेयसीचा मृतदेह दाखवत आहे. त्यानंतर आरोपीने प्रेयसीचे सर्व फोटो इन्स्टाग्रामवर टाकत धोका देत होती असे लिहिले.
जबलपूरमधील प्रसिद्ध मेखला रिसॉर्टमध्ये तरुणीच्या हत्येशी संबंधित खळबळजनक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणीची हत्या केल्यानंतर माथेफिरु प्रियकराने व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये तरुणाने मुलीच्या बेवफाईचा उल्लेख करत आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मेखला रिसॉर्टमधील एका खोलीत 6 नोव्हेंबरला आलेल्या जबलपूर येथील तरुणीची तिच्याच प्रियकराने निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनेनंतर आरोपी तरुण तेथून फरार झाला आहे. अभिजीत पाटीदार असे त्याचे नाव असून, हॉटेलच्या रेकॉर्डनुसार तो गुजरातचा रहिवासी आहे. हत्येनंतर तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंट दुसरे कोणीतरी वापरत आहे. नुकतेच इंस्टाग्राम आयडीवर काही फोटोही शेअर केले आहेत. तरुणीचे इन्स्टाग्राम आयडी तिचा प्रियकरच वापरत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.