कल्याण : कल्याण-डोंबिवलीत चोरट्यांचा हैदोस सुरु आहे. दिवसाढवळ्याही चोरटे चोऱ्या करायला धजावत नाहीत. कायद्याच धाकच या चोरट्यांना राहिला नसल्याचं दिसून येतं. देवाच्या दारात चोऱ्या करण सोडत नाहीत. मंदिरातील दानपेटी, मूर्त्या चोरीला जाण्याच्या घटना नेहमी उघडकीस आली येत आहेत. आता देवाच्या दारातून पुजाऱ्याची कारच चोरट्यांनी लंपास केली आहे. कल्याण पश्चिमेतील स्वामी समर्थ मठाच्या परिसरात ही घटना घडली आहे. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती. ही घटना 9 जून रोजी घडली होती, मात्र 20 दिवस उलटले तरी पोलिसांनी चोरट्यांना अटक केली नाही.
कल्याण पश्चिमेतील स्वामी समर्थ मठाच्या परिसरातून चारचाकी गाडी चोरीला गेली होती. ही गाडी रमेश शिंत्रे यांनी स्वामी समर्थ मठाचे उत्तराधिकारी सचिन चांदे आणि प्रथमेश मोडक महाराज यांना त्यांच्या सेवेसाठी इतर ठिकाणी मठामध्ये आणि कार्यक्रमासाठी जाण्यासाठी दिली होती. मात्र हीच गाडी मठाच्या परिसरातून काही अज्ञात व्यक्तींनी चोरी केली.
यासंदर्भातील खडकपाडा पोलीस ठण्यात देऊन तक्रार 20 दिवस उलटूनही अद्याप चोरटे मोकाटच आहेत. यामुळे लवकरात लवकर गाडीचा छडा लावावा आणि आरोपींना अटक करावे, अशी मागणी स्वामी समर्थ मठातील सेवक दुषांत ढवळे यांनी केली आहे. तसेच चारचाकी वाहन चोरीला जात असल्याने परिसरातील इतर वाहनचालकांमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे.