मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात CBI ने गुन्हा दाखल केला. दोन दिवसांपूर्वीच CBI ने संजय पांडे यांनी लुक आऊट नोटीस बजावली होती. त्यानंतर आता ED आणि CBI च्या रडारवर संजय पांडे (Sanjay Pandey) आले आहेत. संजय पांडे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या जवळचे मानले जात होते. आज संजय पांडे दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. 30 जून रोजी ते पोलीस आयुक्त (Commissioner of Police) पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर तीन दिवसांत त्यांना ईडीनं नोटीस बजावली होती. संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर संजय पांडे हे राज्याचे पोलीस महासंचालक झाले. पण, तांत्रीक आणि कायदेशीर बाबींमुळं त्यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. पांडे यांनी पोलीस सेवेतून निवृत्त होण्यासाठी राजीनामा दिला होता.
पोलीस आयुक्त असताना संजय पांडे यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला होता. एनएसई सर्व्हर काम्प्रमाईज प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आला होता. चित्रा रामकृष्णा प्रकरणात क ऑडीट कंपनी तयार करण्यात आली होती. ती कंपनी संजय पांडे यांची होती, असा त्यांच्यावर आरोप आहे. या दोन्ही प्रकरणी संजय पांडे यांना ईडीनं नोटीस पाठविली होती.
ईडीनंही त्यांनी नॅशनल स्टॉक एक्सचेंज प्रकरणी समन्स बजावले होते. 2001 मध्ये त्यांनी स्वतःची आयटी फर्म सुरू केली होती. संजय पांडे यांनी आई आणि मुलाला फर्मचे संचालक केले होते. या फर्मला एनएसई सर्व्हर आणि सिस्टम्सचे आयटी ऑडिट काँट्रक्ट देण्यात आले होते. या प्रकरणी सीबीआयनं फर्मची चौकशी सुरू केली होती. या प्रकरणी सीबीआयनं गुन्हा दाखल केला. ईडीसुद्धा या प्रकरणाची चौकशी करत आहे.