नाशिक : राज्यात आज एटीएसने (ATS) केलेल्या करवाईतील पाच आरोपींना 3 ऑक्टोबरपर्यंत पोलीस (Police) कोठडी सुनावली आहे. राज्यातील मालेगाव, बीड, पुणे आणि कोल्हापूर येथून पाच जणांना अटक केली होती. या पाचही जणांना नाशिकच्या (Nashik) जिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने एटीएसला या पाचही संशयित आरोपींची 3 ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीएफआय या वादग्रस्त मुस्लिम संघटनेचे हे सर्व पदाधिकारी असून त्यांच्या विरोधात ही कारवाई महाराष्ट्र एटीएसने केली आहे. दहशतवाद्यांना पैसे पुरवले, समाजात अशांतता पसरेल असे कृत्य, कट रचणे असे कृत्य केल्याचा एटीएसला संशय आहे.
आज पहाटेच्या वेळी राज्यातील विविध शहरांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या पथकाने छापेमारी केली होती. त्या छापेमारीत एकूण 20 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
त्यापैकी मालेगाव येथून 1, पुणे येथून 2, बीड येथून 1 आणि कोल्हापूर येथून 1 अटक केलेल्या संशयितांना नाशिकच्या न्यायालयात हजर केले होते.
दुपारी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर जिल्हा न्यायालयात त्यांना हजर केले होते त्यादरम्यान त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पीएफआय ह्या संघटनेचे हे सर्व पदाधिकारी असून देशातील जवळपास तीन लाख कुटुंबाचे त्यांच्याकडे खाते असल्याची माहिती समोर येत आहे.
पीएफआय ही मुस्लिम संघटना असून वादग्रस्त संघटना म्हणून तीची ओळख आहे, कारवाईनंतर संशयितांपैकी अनेकांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याच्या संशयावरून यामध्ये ईडीने देखील सहभाग घेतला असून आणखी संशयितांच्या रडारवर तपास यंत्रणा असल्याची माहिती आहे.
सकाळपासूनच राज्यातील विविध शहरांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचे पथक हे छापेमारी करत असून आत्तापर्यंत 20 जणांना तपासासाठी ताब्यात घेतले आहे.