क्राइम पेट्रोल पाहून रचला स्वतःच्या हत्येचा बनाव; मात्र पोलिसांनी ‘असा’ उधळून लावला कट

| Updated on: Nov 08, 2022 | 4:02 PM

आपल्या कर्जाचा भार हलका करण्यासाठी एका सराईत गुन्हेगाराने दुसऱ्या तरुणाची हत्या केली. अशा प्रकारचे कृत्य केल्यानंतर आपली कर्जातून मुक्तता होईल आणि आपण आरामशीर जीवन जगू, असा मानस आरोपीने बाळगला होता.

क्राइम पेट्रोल पाहून रचला स्वतःच्या हत्येचा बनाव; मात्र पोलिसांनी असा उधळून लावला कट
एकाच कुटुंबातील सहा जणांचा संशयास्पद मृत्यू
Image Credit source: Google
Follow us on

प्रयागराज : सर्वसामान्य जनतेमध्ये गुन्हेगारीबाबत सावधानता निर्माण करण्यासाठी बऱ्याच टीव्ही मालिकांची निर्मिती करण्यात आली आहे. या मालिकांचा मूळ उद्योग हा प्रबोधन आणि सावधानता निर्माण करणे हा आहे. अनेक चॅनेल्सवर अशा मालिका लोकप्रिय ठरत आहे. यामध्ये ‘क्राइम पेट्रोल‘ ही मालिका आघाडीवर आहे. अशा मालिका काही वेळेला गुन्हेगारांच्याही पत्त्यावर पडत असल्याचे काहींचे मत असते. तर या मालिका पाहून काही किशोरवयीन मुले गुन्हेगारीच्या मार्गाला लागल्याचेही बोलले जाते. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये उघडकीस आली आहे.

कर्जातून सुटका मिळवण्यासाठी हत्येचा बनाव

आपल्या कर्जाचा भार हलका करण्यासाठी एका सराईत गुन्हेगाराने दुसऱ्या तरुणाची हत्या केली. अशा प्रकारचे कृत्य केल्यानंतर आपली कर्जातून मुक्तता होईल आणि आपण आरामशीर जीवन जगू, असा मानस आरोपीने बाळगला होता. याच हेतूने त्याने हत्येचा बनाव रचला होता. प्रयागराजमध्ये ही खळबळजनक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

आरोपी सराईत गुन्हेगार

फिरोज अहमद असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात लुटमार, हत्या, हत्येचा प्रयत्न अशा प्रकारचे 24 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामुळे फिरोजचा कायदेशीर प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर खर्च झाला होता. त्यामुळे तो कर्जाच्या डोंगराखाली दबला होता.

हे सुद्धा वाचा

आपली हत्या झाल्याचे भासवण्यासाठी मृतदेहाजवळ स्वतःचे पाकिट फेकले

कर्जातून सुटका करुन घेण्यासाठी फिरोजने स्वतःच्याच हत्येचा बनाव रचला. यासाठी आपल्या शरीरयष्टी जुळणाऱ्या सूरज गुप्ता नामक तरुणाची हत्या केली. हत्येनंतर त्याची ओळख लपवण्यासाठी धड वेगळे केले. त्यानंतर आपलीच हत्या झाल्याचे भासवण्यासाठी मृतदेहाजवळ आपले पाकिट टाकून तेथून पसार झाला.

सखोल तपास केला असता आरोपीचा बनाव उघड

मर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनमोल ढाबा परिसरात पोलिसांना शिरच्छेद केलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी मृतदेहाजवळील पाकिट तपासले असता यात फिरोजचे ड्रायव्हिंग लायसन्स आढळले.

मात्र पोलिसांनी जेव्हा सखोल तपास केला तेव्हा फिरोज जिवंत असून सदर मृतदेह सूरज गुप्ता नामक तरुणाचा असल्याचे पोलिसांना कळाले. त्यानंतर पोलिसांना फिरोजवर संशय आला. त्याआधारे पोलिसांनी फिरोजच्या पत्नीची चौकशी केली, मात्र फिरोजचा कुठेही पत्ता लागत नव्हता.

सापळा रचून आरोपीला अटक

अनमोल ढाबा परिसरात फिरोज आपल्या स्कुटीवरुन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एसआर डिग्री कॉलेज परिसरात घेराव घालत फिरोजला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र फिरोज पोलिसांच्या दिशेने गोळीबार करत पळून जाऊ लागला.

पोलिसांनीही फिरोजवर गोळीबार केला. यात त्याच्या पायाला गोळी लागली आणि तो खाली कोसळला. यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याच्याकडे धाव घेत त्याला ताब्यात घेतले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. हत्या झालेल्या तरुणाचे नाव सुरज गुप्ता असून तो मूळचा बिहार येथील रहिवाशी होता.