गजियाबाद – लग्नाच्या (marriage) दुसऱ्या दिवशी नव्या नवरीचा मृत्यू झाल्यामुळे दोन्ही कुटुंबियांना शॉक (Family shock) बसला आहे. आदल्या दिवशी धुमधडाक्यात लग्न झालं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी मृत्यू झाल्याने परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. नव्या नवरीचा मृत्यू (Woman Death) बाथरुम बेशुध्द अवस्थेत सापडला. नवरा मुलगा सुध्दा या घटनेमुळे एकदम घाबरला असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.
लग्न वाजतगाजत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नवरीचा बाथरुममध्ये गिझरचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नवरा मुलगा एकदम घाबरला आहे. त्याचबरोबर दोन्ही कुटुंब सुध्दा ओक्साबोक्सी रडत आहेत. विशेष म्हणजे या दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
गाजियाबादमधील जागृती विहारमधील इंजिनिअर पारस त्यागी याचं लग्न शुक्रवारी झालं, त्यानंतर शनिवारी पत्नी गिझरने अंधोळीसाठी पाणी गरम करत होती. गिझरमधून निघालेल्या गॅसमुळे वैशाली या बेशुध्द झाल्या, त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
वैशालीच्या माहेरच्या लोकांना रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास नकार दिला असल्याची होता. विशेष म्हणजे शनिवारी नवऱ्याच्या घरी जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं.