दारुच्या नशेत पत्नीशी भांडण झाले, मग माथेफिरु पतीने जे केले ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल

| Updated on: Dec 17, 2022 | 9:17 PM

मुलाला फेकल्यानंतर पित्याने देखील उंचावरून खाली उडी मारली. त्यामुळे दोन वर्षाचा मुलगा आणि त्याच्या पित्यावर गंभीर अवस्थेत दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दारुच्या नशेत पत्नीशी भांडण झाले, मग माथेफिरु पतीने जे केले ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल
पैशाच्या वादातून अल्पवयीन मुलाला मित्रांनी संपवले
Image Credit source: Google
Follow us on

नवी दिल्ली : पती-पत्नीच्या भांडणामध्ये लहान मुलांच्या पालनपोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकदा घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो. याचबरोबर नियमित भांडणांमध्ये देखील मुलांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. गुन्हेगारीचे मालिका सुरू असलेल्या राजधानी नवी दिल्लीमध्ये अशा प्रकारची एक धक्कादायक घटना उजेडात आली आहे. पती आणि पत्नीमध्ये झालेल्या वादात पित्याने आपल्या दोन वर्षाच्या लहान चिमुरड्याला 21 फूट उंचावरून खाली फेकले. हा धक्कादायक प्रकार उजेडात आल्यानंतर संपूर्ण दिल्लीमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

पित्याच्या या निर्दयी कृत्याबद्दल संताप देखील व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे मुलाला फेकल्यानंतर पित्याने देखील उंचावरून खाली उडी मारली. त्यामुळे दोन वर्षाचा मुलगा आणि त्याच्या पित्यावर गंभीर अवस्थेत दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपीने दारूच्या नशेत केले निर्दयी कृत्य

आरोपी हा मद्यपी आहे. दोघांमध्ये भांडण झाल्यामुळे पत्नी काही दिवसांपासून दोन मुलांसोबत आपल्या आजीच्या घरी राहत होती. आरोपीने तेथे जाऊन पत्नीशी क्षुल्लक कारणावरून वाद सुरू केला. हा वाद आणखी भडकताच आरोपीने आपल्या लहान चिमुरड्याला हाताशी पकडून 21 फूट उंचावरून खाली फेकून दिले.

हे सुद्धा वाचा

पत्नीवरचा राग अनावर झाल्यामुळे त्याने हे निर्दयी कृत्य केले. घटनेवेळी तो दारूच्या नशेत होता. त्यामुळे त्याला स्वतःचा संताप आवरता आला नाही. मात्र मुलाला उंचावरून खाली फेकल्यानंतर त्याला पश्चाताप झाला आणि त्याने स्वतः देखील उडी मारली. शुक्रवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली.

दोघांचीही प्रकृती गंभीर

या घटनेमध्ये आरोपी मान सिंह आणि त्याचा मुलगा गंभीर अवस्थेत आहे. मान सिंह याच्यावर एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत, तर मुलाला होली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आरोपी मान सिंह याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.