बार्शी – तालुक्यातील ‘मळेगाव पोलखोल’ या फेसबूक पेजमुळे (Facebook Page) संपूर्ण गाव वैतागल्याची घटना समोर आली आहे. या फेसबूक पेजवरुन महिला तसेच गावातील प्रतिष्ठित पुरुषांची बदनामी केली जात असल्याचा आरोप मळेगाव ग्रामस्थांनी केलाय. याबाबत जवळपास पन्नासहून अधिक महिलांनी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे तक्रार केली आहे. मळेगाव पोलखोल (Malegaon Polkhol) या फेसबुक पेजवरुन गावातील महिलांची, तरुणींची बदनामी केली जात आहे. गावच्या महिला सरपंचांविरोधात देखील आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहे. यामुळे गावातील महिलांचे आयुष्य उध्द्वस्त होत आहे. त्यांचे संसार मोडले जात आहे. नांदायला गेलेल्या विवाहित महिलांचे नांदने अवघड झाले आहे. अशा विविध मागण्या घेऊन मळेगाव येथील महिलांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Tejaswini Satpute) यांना निवेदन दिले. हे सर्व ज्या मळेगाव पोलखोल फेसबुक पेजवरुन होत आहे. त्या फेसबूक अकाऊंटची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना जेरबंद करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी याबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे महिलांनी सांगितले.
सोशल मीडियावर अनेर गोष्टी व्हायरल केल्या जातात. परंतु मागच्या अनेक दिवसांपासून मळेगाव पोलखोल या फेसबूक पेजवरून चुकीच्या गोष्टी पसरवून लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण केला जात असल्याचा आरोप महिलांनी पोलिस अधिक्षकांकडे केली आहे. जी व्यक्ती फेसबूक पेज हॅंडल करीत आहे. त्यांनी इतक्या आक्षेपार्ह गोष्टी टाकल्या आहेत, की गावातील लोक प्रचंड संतापले आहेत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गावातील महिलांना आधार दिला असून लवकरचं संबंधित इसमाला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
संबंधित फेसबूक पेजचा आधार घेऊन गावातील प्रतिष्ठित महिला आणि मुलींची बदनामी केली जात आहे. त्याचबरोबर गावात महिला संरपंच आहेत. त्यांच्या विरोधात देखील आक्षेपार्ह पोस्ट केल्याचं उघडकीस आलं आहे. फेसबूकच्या पोस्टमुळे अनेक महिलांचे संसार मोडले जाण्याची शक्यता तक्रारी महिलांनी लिहिली आहे.