आईच्या मृतदेहाजवळ 3 दिवस बसून होती मुलगी; दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले

| Updated on: Feb 14, 2023 | 11:32 AM

सोमवारी बदन राय लेनमधील रहिवाशांना दुर्गंध आला. त्यांनी पोलिसांना सूचना दिली. पोलीस बेलेघाटा येथील त्यांच्या घरी पोहचले. मृतदेह ताब्यात घेऊ शवविच्छेदनासाठी पाठविला.

आईच्या मृतदेहाजवळ 3 दिवस बसून होती मुलगी; दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील बेलेघाटा भागात भयंकर घटना समोर आली. आईच्या मृत्यूनंतर तीन दिवस मुलगी मृतदेहाजवळ बसून होती. दुर्गंध पसरल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. ९० वर्षीय आईचे निधन झाले. त्यानंतर तिच्या मृतदेहाजवळ तिची ६४ वर्षीय मुलगी तीन दिवस बसून होती. दोघी मायलेकी घरी राहत होत्या. कोलकाता येथील बेलेघाटा भागात ही घटना समोर आली. सोमवारी पोलिसांना शेजाऱ्यांनी या घटनेची सूचना दिली. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मृतक महिलेचे नाव नमिता घोष आहे.

नमिता घोष (वय ९० वर्षे) या बेलेघाटा येथील बदन राय लेन येथे राहत होत्या. त्याच घरी त्यांची मुलगीसुद्धा राहत होती. नमिता यांची मुलगी विधवा असून, ती ६४ वर्षांची आहे. मुलगी मानसिक रुग्ण असल्याने तिला आईचा मृत्यू झाल्याचं कळलचं नाही. त्यामुळं ती आईच्या शेजारी बसून होती.

९० वर्षीय महिला आजारी होती

सोमवारी बदन राय लेनमधील रहिवाशांना दुर्गंध आला. त्यांनी पोलिसांना सूचना दिली. पोलीस बेलेघाटा येथील त्यांच्या घरी पोहचले. मृतदेह ताब्यात घेऊ शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलिसांनी बघीतलं की, मुलगी आईच्या मृतदेहाशेजारी बसली आहे.

ती मुलगी निरोगी आहे की, नाही याचा तपास आता पोलीस करत आहेत. शेजाऱ्यांनी सांगितलं की, ९० वर्षीय महिला आजारी राहत होती. वृद्धावस्थेमुळं त्यांचा मृत्यू झाला. परंतु, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कळेल. शवविच्छेदनासाठी मृतदेह एनआरएस मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात आला.

मायलेकीचं राहत्या होत्या घरी

महिलेचा मृत्यू केव्हा झाला असावा, हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल. परंतु, मुलीनं कुणालाही का कळविलं नाही. याचे उत्तर पोलिसांना अद्याप मिळाले नाही. मायलेकींचे दुसरे कोणी जवळचे नातेवाईक नसल्याचं शेजारच्या लोकांचं म्हणण आहे. मृतक महिलेच्या नवऱ्याची कंपनी होती. पण, काही वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. मायलेकींवर आर्थिक संकट कोसळलं होतं. काही दिवसांपूर्वी मुलगी पाण्यासाठी बाहेर निघाली होती. त्यावेळी ती नालीत पडली होती. त्यानंतर तीसुद्धा घराबाहेर पडली नव्हती, असंही शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं.