श्राद्धाची तयारी सुरु होती इतक्यात आला मुलीचा फोन, म्हणाली, ‘पप्पा मी जीवंत आहे’

| Updated on: Aug 21, 2023 | 4:40 PM

घरातील मुलीच्या मृत्यूने अख्खे घर दु:खात बुडालेले असताना अचानक मुलीच्या वडीलांच्या फोनवर व्हिडीओ कॉल आल्याने खळबळ उडाली, हा फोन त्यांच्या मृत मुलीचाच होता.

श्राद्धाची तयारी सुरु होती इतक्यात आला मुलीचा फोन, म्हणाली, पप्पा मी जीवंत आहे
Representative image
Image Credit source: socialmedia
Follow us on

बिहार | 21 ऑगस्ट 2023 : घरात मुलीच्या मृत्यूने सगळ्यात घरभर अक्षरश: अवकळा पसरली होती. सगळे नातेवाईक शोकमग्न होते. घरातील मुलगी गेल्या महिनाभरापासून बेपत्ता झाली होती, त्यानंतर एक मृतदेह सापडला. घरातल्यांनी तिच्या कपड्यांवरुन ती मुलगी त्यांचीच असल्याची सांगत मृतदेह ताब्यात घेतला. तिच्या श्राद्धाची तयारी सुरु असताना अचानक मुलीच्या पित्याच्या मोबाईलवर फोन आला. पलिकडून चक्क त्यांनी मृत्यू पावलेली मुलगी आपण जीवंत असून सुखरुप असल्याचे सांगत होती. घरातल्यांसाठी हा सुखद धक्का होता. परंतू जिला आपली मुलगी समजून अंत्यसंस्कार केले ती कोण असा सवाल निर्माण झाला आहे.

बिहारच्या पूर्णिया येथील अकबरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही आश्चर्यकारक घटना सर्वत्र चर्चेत आली आहे. येथील अंशू कुमारी एक महिन्यांपासून अचानक घरातून रहस्यमयरित्या गायब झाली होती. कुटुंबियांनी तिची सर्वत्र शोधाशोध केली परंतू तिचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. गेल्या आठवड्यात एका शेजारील नाल्यात एका मुलीचा मृतदेह सापडला. त्या मुलीचा मृतदेह ओळखण्यापलिकडचा होता. परंतू कपड्यांच्या आधारे या मुलीला त्या कुटुंबिया ती अंशू असल्याचे सांगत मृतदेह ताब्यात घेतला. वडीलांना इतका धक्का बसला की त्यांनी अवस्था बिकट झाली. त्यानंतर तिच्यावर रितीरिवाजानूसार तिच्या आजोबांनी अत्यंसंस्कार केले. अखेर नातीच्या श्राध्दाची तयारी सुरु होती.

व्हिडीओ कॉल आला

सर्व घर दु:खात बुडालेले असताना अंशूच्या वडील विनोद मंडल यांच्या मोबाईलवर अचानक व्हिडीओ कॉल आला. पलिकडून चक्क अंशू बोलत असल्याचे पाहून घरच्यांना सुखद धक्का बसला. मुलगी म्हणाली, पप्पा मैं जिंदा हूं. त्यामुळे श्राद्धाची तयारी करणारे कुटुंबिय हर्षोउल्हासात बुडाले. घरात सुरु असलेला दु:खाचा माहोळ बदलला. त्यानंतर धाडस करुन अंशू म्हणाली की तिने प्रियकराबरोबर पळून जाऊन लग्न केल्याचे सांगितले. ती सध्या पूर्णियातील बनमनखी ब्लॉकच्या जानकीनगर परिसरात सासरी सुखाने रहात असल्याचे सांगितले.

जिचा मृतदेह सापडला ती कोण ?

आता अंशू समजून जिच्यावर अंत्यसंस्कार केला ती मुलगी कोण ? असा सवाल निर्माण झाला आहे. अंतिम संस्कार झालेल्या मुलीबद्दल पोलीस प्रमुखांनी सांगितले की संबंधित मुलीचा प्रेमप्रकरणात खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. मुलीच्या घरात पोलिसांनी धाड टाकली असता तिचे पालक फरार झाले आहेत असे अकबर पोलिस ठाण्याचे सूरज प्रसाद यांनी सांगितले.