दिपक कापरे, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, पुणे | 5 फेब्रुवारी 2024 : बारामती शहरातील सिनेमा रस्त्यावरील एका प्रसिध्द लॉजमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे दाम्पत्य या शहरातील मध्यवर्ती भागातील लॉजवर उतरले होते. काल सायंकाळी पती लॉजमधून बाहेर पडला. परंतू पत्नी आतच होती. लॉजच्या कर्मचाऱ्यांना या महिलेचा खून झाल्याचे समजल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. या महिलेचा खून तिच्या पतीनेच केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. दरम्यान, या पतीने त्याच्या पत्नीचा खून का केला याचा तपास पोलिस करीत आहेत.
बारामतीतील सिनेमा रस्त्यावरील एका प्रसिध्द लॉजवर एका दाम्पत्याने काल रुम बुक केली होती. त्यानंतर सायंकाळी पती बाहेर पडला. त्यानंतर या रुममध्ये ही महिला निपचित पडल्याचे आढळल्याने खळबळ उडाली. त्यानंतर या महिलेच्या पतीनेच तिची हत्या केल्याचे उघडकीस आले. या पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर लॉजमधून तो पळून गेला. त्यानंतर त्याने आपल्या नातेवाईकांना स्वत:च फोन करुन आपल्या पत्नीची हत्या केल्याची कबूली दिल्याचे उघडकीस आले आहे. हे दाम्पत्य दौंड तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहीती उघडकीस आली आहे.
बारामती शहरातील सिनेमा रस्त्यावरील एका लॉजवर काल एक जोडपे आले होते. सायंकाळी पती लॉजमधून बाहेर पडला. त्याने आपल्या पत्नीचा खून केल्याची माहिती स्वत:च नातेवाईकांना दिली. त्यानंतर नातेवाईकांनी बारामतीतील या लॉजचा शोध घेतल्यानंतर ही घटना उघड झाली आहे.दरम्यान, पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर बारामती शहरात एकच खळबळ उडाली असून पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. नेमक्या कोणत्या कारणातून ही हत्या झाली किंवा या घटनेमागील सत्य पोलिस तपासाअंतीच समोर येणार आहे.