लखनऊ : एका प्रोढ माणसाने डेटींग अॅपद्वारे एका महिलेशी ऑनलाईन गप्पा मारीत तिला आपल्या जाळ्यात ओढले. अनेक महिने या महिलेशी त्यांचे फोनवरून चॅटींग सुरू होते. परंतू या महिलेने आपल्याला एक मुलगी असल्याचे सांगत आपण एकत्र येऊ शकत नसल्याचे स्पष्ट करीत त्याच्याशी बोलायचे. त्यानंतरही त्या प्रोढ माणसाने तिच्याशी मैत्री चालूच ठेवून अखेर ते एकत्र येऊन राहू लागले. परंतू त्यानंतर त्याची नियत फिरली आणि त्याने या महिलेच्या अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेण्यास सुरूवात केली.
उत्तर प्रदेशातील बांदा बबेरू कोतवाली गावात राहणाऱ्या एका प्रोढ वयीन व्यक्तीने डेटींग अॅपच्या मदतीने राजस्थानातील एका महिलेशी मैत्री केली. या महिलेला आधीच्या पतीपासून एक अल्पवयीन मुलगी होती. फोनवरील मैत्रीनंतर ही महिला त्याच्यासोबत बांदा येथे एकत्र एक वर्षांपासून राहू लागली. त्यानंतर या प्रोढ व्यक्ती सोबत ही महिला पत्नी सारखी राहू लागली. आणि तिच्या मुलीला त्याने आपली मुलगी मानण्याचे नाटक केले. या महिलेने वारंवार मुंबईला जाण्याचा हट्ट त्याच्याकडे लावला. परंतू त्याने कशीतरी तिची मनधरणी करीत तिला शांत करीत राहीला.
नियत फिरली आणि…
काही काळानंतर या प्रोढ व्यक्तीची नियत फिरली आणि अखेरीस त्याने घरी कोणी नाही हे पाहून अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार केला. 19 एप्रिल रोजी या कथित पतीने तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. तिने विरोध केल्याने त्याने तिला मारहाण केली. ती जोरजोरात ओरडत असल्याने आणि कोणा तिने काही सांगू नये म्हणून तिला मारहाण करीत तिचा हातच मोडला. त्यानंतर तिची आई घरी आल्यावर तिने सर्व अत्याचाराचा पाढा वाचला. त्यानंतर या महिलेने पोलीस ठाणे गाठून तक्रार केली.
खूनाचा आरोपी बेलवर बाहेर
पोलिसांनी आरोपीवर बलात्कारासह पॉक्सो अॅक्ट ( POCSO ACT ) दाखल करण्यात आला आहे. या आरोपीवर साल 2003 मध्ये झालेल्या खूनाचाही गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली असून तो कोर्टातून जामीन मिळाल्याने बाहेर पडल्याचेही उघडकीस आले आहे. आरोपीला अटक झाली असून त्याच्या विरोधात आता आणखी कठोर कारवाई होणार आहे.