यवतमाळ : शासकीय नोकरीसाठी तरुण काय करतील याचा काही नेम नाही. यांच्या आगोदर सुद्धा अनेक तरुणांनी जातीचे बनावट (duplicate caste certificate) दाखल दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर काही जणांनी तर सध्या पोलिस भरती होण्यासाठी विविध पध्दतीच्या आयडीया लावल्या असल्याचं उघडकीस आलं आहे. बनावट ‘प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र’ जोडून एकाने पोलिस अधिकाऱ्यांची (police officer) चांगलीचं भंबेरी उडवली आहे. यवतमाळ पोलिसांच्या चलाखी पणामुळे हे सगळं प्रकरण चव्हाट्यावर आलं आहे. अशा पद्धतीने प्रमाणपत्र तयार करुन देणारी टोळी असल्याचं पोलिस तपासात उघडकीस आलं आहे. यामध्ये एका वकिलाला सुध्दा पोलिसांनी अटक (yavatmal police) केली आहे.
बीड येथे राहणारा पांडुरंग ढलपे हा वकील आहे. त्याचबरोबर या रॅकेटचा मास्टरमाईंड तोचं असून तो बनावट प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र तयार करून देत होता. शिवाय स्वाक्षरी सुद्धा बनावट करत होता अशी माहिती यवतमाळ पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात सगळ्या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर कसून चौकशी करण्यात येणार आहे. तसेच राज्यात इतर ठिकाणी यांच्यातला आणखी कोण आहे का ? याचा सुध्दा पोलिस शोध घेणार आहेत.
यवतमाळ पोलिस भरतीत पात्र ठरलेल्या एका 24 वर्षीय युवकाने प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र जोडून 30 नोव्हेंबर 2022 रोजी यवतमाळ येथील पोलिस भरतीसाठी अर्ज केला होता. चाचणीत तो उत्तीर्ण झाल्यानंतर 17 मे 2023 रोजी त्याचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा अंदाज यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिक अनिकेत पांडे यांना आला. त्यानंतर 19 मे रोजी त्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले. त्यानंतर लिपिक पांडे यांच्या तक्रारीवरून दराटी पोलिस ठाण्यात 420 नूसार गुन्हा नोंद करण्यात आला. त्यामध्ये पोलिसांनी सखोल तपास करून या टोळीचा पर्दाफाश केला आहे.