काका – पुतण्याचं नातं तसं रक्ताचं असतं. परंतू एका पुतण्याने आपल्या काकांवरच जीवघेणा हल्ला केल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे. या पुतण्याने आपल्या काकांना सकाळी शेतात फिरताना पाहीले आणि त्याचं टाळकं सटकलं. त्याने काकांवर चाकूने वार केले. त्यामुळे मक्याच्या शेतात त्याचे काका रक्तबंबाळ होऊन पडून राहीले. त्यांनी मदतीसाठी धावा केल्याने अखेर त्यांच्या गावातील लोकांनी त्यांना नजिकच्या गावातील सरकारी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना डॉक्टरांनी उपचार सुरु करण्यापूर्वीच जादा रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला का केला याचे कारण तितकेच धक्कादायक आहे.
पंजाबातील जालंधर शहरातील शाहकोट गावात लखवीर सिंह ऊर्फ लक्खा ( 65 ) याची हत्या त्याच्या सख्ख्या पुतण्याने केली आहे. पोलीसांनी आरोपी पुतण्याला अटक केली असली तरी त्याचे तीन साथीदार मात्र फरार झाले आहे. अटक आरोपीला पोलीस कोर्टात सादर करुन रिमांड घेणार आहेत. या प्रकरणात लखवीर सिंह आपल्या शेतातून सकाळी फिरत होते. त्यावेळी त्यांच्या मोठ्या भावाचा मुलगा तेथील मक्याच्या शेतातून अचानक बाहेर येत त्याने तीन साथीदारांच्या मदतीने काकांवर जीवघेणा हल्ला केला. यावेळी चाकूने वार करुन पुतण्या जसविंदर सिंह याने काकाला गंभीर जखमी केले आणि आपल्या कुटुंबासह पळून गेला.
आरोपी पुतण्या जसविंदर याचे काकाशी जमीनीवरुन वाद सुरु होते. पुतण्या आपल्या काका लखवीर यांना शेतातील विहीरीचे पाणी घेण्यास रोखायचा त्यांच्यात जमीनीचा वाद कोर्टात पोहचला आहे. त्याने काकांवर जीवघेणा केल्यानंतर जखमी लखवीर यांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतू त्यांचे प्राण वाचविता आले नाहीत. त्यानंतर आरोपी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत अत्यविधी करणार नसल्याचे लखवीर यांच्या कुटुंबियांनी सांगितले. त्यानंतर पोलीसांना फरार झालेल्या जसविंदर सिंह याला पकडून आणले, त्याच्या तीन साथीदारांचा शोध सुरु आहे.