दिल्ली | 25 जानेवारी 2024 : आर्टीफिशियल इंटेलिजन्स ( AI ) तंत्रज्ञानाचा अलिकडे खूप बोलबाला आहे. एआय तंत्रज्ञानाचा अलिकडे गैरवापर देखील झाला आहे. परंतू पोलिसांनी याच एआय तंत्रज्ञानाचा वापर करीत एका खुनाच्या गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिसांना एका पुलाखाली एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. परंतू कोणताही धागा सापडत नव्हता. या मृतदेहाजवळ कोणतीही कागदपत्रे किंवा त्याची ओळख पटले असा कोणातीही पुरावा सापडला नसल्याने पोलिस बुचकळ्यात सापडले होते. अखेर पोलिसांनी या मृतदेहाच्या चेहऱ्यावरुन एआय तंत्रज्ञान वापरून त्याचा चेहरा हुबेहुब तयार केला. त्यानंतर अखेर गुन्हेगारापर्यंत पोलिस पोहचले.
दिल्ली पोलिसांना दिल्लीतील गीता कॉलनी फ्लायओव्हर खाली 10 जानेवरी रोजी एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाजवळ कोणताही ओळख पटणारा कोणताही पुरावा किंवा काहीही धागेदोरे सापडले नसल्याने पोलिसांना कोड्यात टाकले. हा मृतदेह कोणाचा आहे. त्याचा कोणी खून केला. याबाबत कोणताही पुरावा आरोपींनी मागे ठेवला नव्हता. त्यामुळे पोलिसांना मोठे कोडे पडले. पोलिसांना मृतदेह पोस्ट मार्टेमसाठी पाठवून दिला. या तरुणाचा गळा दाबून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी 30 पोलिसांचे पथक नेमण्यात आले. या तरुणाची ओळख पटवणे हे सर्वात आधी गरजेचे होते. त्या मृतदेहाचे डोळे बंद असल्याने आम्ही त्या तरुणाचे डोळे उघडे असताना चेहरा कसा दिसेल असा फोटो एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केला. फोटोची बॅकग्राऊंड देखील बदलण्यात आली. त्यानंतर हा फोटो क्राईम एण्ड क्रिमिनल ट्रॅकींग नेटवर्क वेबसाईटवर हा फोटो अपलोड करण्यात आला. ही वेबसाईट आठ राज्यातील पोलिस ठाण्यांशी कनेक्ट असल्याने ओळख पटविण्यात मदत होईल असा पोलिसांचा हेतू होता. आणि 400 पोस्टर्स तयार करून सर्वत्र लावण्यात आले. आणि व्हॉट्सअप ग्रुपवर हा फोटो शेअर करण्यात आला. 12 जानेवारीपर्यंत हा प्रकार करण्यात आला.
त्यानंतर या केसमध्ये एक मोठ यश मिळाले. एका पोलिस स्टेशन बाहेर हे पोस्टर पाहून एका व्यक्तीने पोलिसांशी संपर्क साधत हा आपला भाऊ हितेंद्र असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. त्यानंतर कळल्या की एका महिलेवरुन दोन महिन्यांपूर्वी हितेंद्र याचे दोघा जणांशी भांडण झाले होते. 9 जानेवारी रोजी त्या दोघा जणांनी हिंतेंद्रला पुन्हा गाठून त्याला जाब विचारत त्याची गळा दाबून हत्या केली. या दोघांनी नशेच्या धुंदीत हितेंद्र याची हत्या केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात महिला आणि एका टॅक्सी ड्रायव्हरसह चार जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.