पुणे : पुण्यातील कोयता गॅंगची दहशत काही केल्या थांबायला तयार नाहीये. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील विविध भागात कोयता, चाकू घेऊन दहशत करत दिसेल त्याला भोसकण्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे पुण्यातील कोयता गॅंग पोलिसांना थेट आव्हान देतेय का काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. नुकताच सिंहगड कॉलेज परिसरात दोघांनी दुकानदार आणि नागरिकांवर चाकूने भोसकले होते, यामध्ये दिसेल त्याला या दोघांनी मारहाण करत धिंगाना घालण्यास सुरुवात केली. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना तक्रार दिली होती. मात्र, तरीही कोयता गॅंग पोलिसांना गुंगारा देत होती. त्यामध्ये पोलीसांनी गस्त कायम ठेवली होती. त्याच दरम्यान दोघांनी सिंहगड कॉलेज परिसरात धिंगाणा घालण्यास सुरुवात केली आणि पोलीसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला, दोघांनीही जोरात पळ काढला. कोयता गॅंगचे असलेले हे पंटर पुढे आणि पोलीस मागे असा थरार सिंहगड रोडवर सुरू होता. अखेर पोलीसांनी दुचाकीवरुण पाठलाग करत एकाला पकडले. दूसरा पळून जाण्यात यशस्वी ठरला.
पोलीसांच्या हाती लागलेल्या तरुणाला पुणे पोलीसांनी रस्त्यात बेदम चोप दिला, हातातील काठीने तरुणाला रस्त्यावरच चोप दिल्याने नागरिकांनी शिट्टया आणि टाळ्या वाजवल्या.
पुण्याच्या सिंहगड कॉलेजजवळ दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणांना पोलिसांचा चोप #Pune #Police pic.twitter.com/ILmdMdkjYc
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) December 30, 2022
पुणे पोलीसांनी केलेली ही दबंगगिरी नागरिकांना दिलासा देणारी आहे, गेल्या काही दिवसांपासून याच परिसरात कोयता गॅंगने दहशत माजवली आहे.
कोयता गॅंगने एकप्रकारे पुणे पोलिसांना आवाहन दिले होते, त्यातील एक तरुण पोलीसांच्या हाती लागला असून तो अल्पवयीन आहे.
पळून गेलेल्या दुसऱ्या संशयिताचे करन दळवी आहे, त्याच्यासह कोयता गॅंगचा शोध पुणे पोलीसांनी सुरू केला असून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा संपूर्ण प्रकार घडला त्याचे नागरिकांनी चित्रीकरण करून सोशल मीडियावर शेअर करत पुणे पोलिसांचे अभिनंदन केले आहे, कोयता गॅंगची पोलीसांनी दहशत मोडून काढावी अशी मागणी होऊ लागली आहे.