पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी पुणेच्या सिंहगड रोड परिसरात कोयता गॅंगच्या दोघांनी दहशद निर्माण करण्यासाठी धिंगाणा घातला होता. त्यावेळी नागरिकांच्या तक्रारी नंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यातील एका पकडून भर रस्त्यात चोप दिला होता. याचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये पुणे पोलीसांच्या दोन कर्मचाऱ्यांनी कोयता गॅंगच्या संशयित आरोपीला शिकवलेला धडा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंगची दहशत कायम आहे. पुणे पोलीसांनी शहरातील कुठल्या ना कुठल्या भागात कोयता गॅंग हाती लागेल यासाठी प्रयत्न सुरू ठेवले असले तरी कोयता गॅंगचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच कोयता गॅंग हाती लागत नसली तरी दुसरीकडे दोन जिगरबाज पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे जोरदार कौतुक केले आहे. जिगरबाज पुणे पोलिसांना पन्नास हजारांचे रिवार्ड जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय सोशल मिडियावर दोघेही चर्चेत आले आहे.
पुण्यात कोयता गॅंगला धडा शिकवणाऱ्या दोन जिगरबाज पुणे पोलिसांना पन्नास हजार रुपयांचे रिवार्ड जाहीर झाले आहे.
याशिवाय दोन्हीही जिगरबाज पोलिसांचा सोशल मीडियावरही चांगलाच डंका निर्माण झाला आहे, फेसबुकवर 60 हजारांवर फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे.
पुण्याच्या सिंहगड कॉलेजजवळ दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणांना पोलिसांचा चोप #Pune #Police pic.twitter.com/ILmdMdkjYc
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) December 30, 2022
कोयता गँगची नशा उतरविणारे पोलीस कर्मचारी धनंजय पाटील आणि अक्षय इंगवले हीरो ठरले होते, तर पुण्यातील नागरिक दोन्ही पोलिसांचे स्वागत करत आहे.
सिंहगड परिसरात कोयता गँगच्या सदस्यांना या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी चोप दिला त्यानंतर त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते.